पान:पाकिस्तानचे संकट.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाकिस्तानचे संकट (ऑक्टोबर १९१६). १९ हिंदी सभासदांत मुसलमान सभासदहि आहेत याचा पूर्ण फायदा घेण्याचे लो. टिळकांनी ठरविले. अहमदाबादच्या प्रांतिक सभेच्या अध्यक्षस्थानी बॅ० जीनांची नेमणूक झाली. लखनौच्या संस्मरणीय काँग्रेसमध्ये जहाल, नेमस्त, मुस्लीमलीगवाले या सर्वांची दिलजमाई झाली. यां प्रसंगी काँग्रेस व लीग यांच्या दरम्यान जातीय प्रश्नाबाबत जो निकाल ठरला तोच प्रसिद्ध लखनौ-करार होय. मोर्ले-मिंटो सुधारणांच्या प्रसंगी मुसलमानांचे स्वतंत्र मतदारसंघ सुरू झाले त्याबद्दल गोखल्यांना नांवें ठेवणारे त्यांचे शिष्य आढळतात; त्याप्रमाणेच, लखनौ-करारांतील स्वतंत्र मतदारसंघांबद्दल टिळकांना नांवें ठेवणारे टिळकशिष्यहि आढळतात ! चुकलेल्या गोष्टीला चूक म्हटल्याबद्दल राग न मानण्याइतके टिळक उदारवृत्तीचे होते! लखनौ-करारांत खरोखरच चुका असतील तर त्या दाखविल्याबद्दल स्वतः टिळकच रागावले नसते; मग इतरांना त्याबद्दल राग येण्याचे काहीच कारण नाहीं! मुसलमान सध्यां जें पाकिस्तान मागत आहेत त्या पाकिस्तानमध्ये द्विराष्ट्रवाद हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. गोखले अगर टिळक यांनी स्वतंत्र मतदारसंघांना आपद्धर्म म्हणून मान्यता दिली त्याच वेळी, 'आम्ही स्वतंत्र राष्ट्र आहों' या मुसलमानांच्या मागणीलाहि त्यांनी मान्यता दिली असे मानणे, म्हणणे अगर सुचविणे म्हणजे ऐतिहासिक घटनांच्या क्रमाची उलथापालथ करण्यासारखे आहे. द्विराष्ट्रवाद बोकाळविण्यांत, बॅ० जीना हे अलीकडच्या जर्मनतंत्राचे लांडोराप्रमाणे अनुकरण करीत आहेत ही गोष्ट सर्वमान्य झालेली आहे. हे जर्मनतंत्र भले. वाईट कसेंहि असो, त्याचा उगम व्हर्साय तहाच्या वेळी ज्या अन्यायांच्या राशी रचल्या गेल्या त्यांत आहे. या तहाच्या तीन वर्षे आधीं लखनौ-करार झाला. प्रादेशिक अगर भौगोलिक राष्ट्राची कल्पनाच त्या वेळी सर्वांच्या मनांत होती. मुसलमान ही हिंदुस्थानांतली एक अल्पसंख्य जमात आहे ही भाषासरणी त्याच वेळी रूढ ती असे नव्हे तर, परवांपरवांपर्यंत पुष्कळसे मुसलमानहि हीच भाषासरणी वापरीत होते. हिंदुस्थानांतल्या राष्ट्ररूप हिंदुसमाजातर्फे अल्पसंख्य मुसलमान वर्गाशी तडजोड करतांना टिळकांनी देवाणघेवाण केली आणि ती करतांना, नाइलाज म्हणून, त्यांनी स्वतंत्र मतदार संघांना मान्यता दिली! याचा अर्थ त्यांनी स्वतंत्र मुसलमान राष्ट्राला