पान:पाकिस्तानचे संकट.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुसलमानांच्या मागण्यांचा क्रमविकास ignorant of the movement of which they attempted to take advantage.* . (या धडपडींत गुंतलेले क्रांतिकारक फार आशावादी होते. त्यांनी कांहीं जर्मन लोकांशी संधाने बांधली. पण, हे जर्मन लोक ज्या चळवळीचा फायदा घेऊ पाहात होते त्या चळवळीचे ज्ञान त्यांना मुळीच नव्हते.) हे सगळे खरें असेल; पण, युद्ध पुरे होण्यापूर्वीच, २०-८-१९१७ रोजी, हिंदुस्थानला जबाबदारीचे स्वराज्य देण्याबाबतची जी घोषणा अधिकृतरीत्या करण्यांत आली तिच्या बहुविध प्रवर्तक कारणांत या धडपडीचीहि गणना करावीच लागेल ! They also serve who only stand and wait, (चालू उद्योगाला विरोध न करतां तटस्थ राहणारे देखील उपकारक ठरतात) हे जर खरे तर, या धडपडी अजिबात उपकारक ठरल्या नसतील असें तरी कां मानावें? सर द्दीलगतच्या मुसलमानांतहि आपल्या विचारांचे वारें फैलावतां येईल अशी क्रांतिकारकांची अपेक्षा होती. ती अगदीच निराधार नव्हती ही गोष्ट 'रेशमी पत्रांचा कट' हे प्रकरण नीट तपासलें तर सहज पटते. निराश होऊन स्वस्थ बसणे हा लो. टिळकांचा स्वभावच नव्हता. आपला राष्ट्रीय पक्ष सचेतन करून व संघटित पक्ष आणि जोरदार लोकमत यांच्या बळावर काँग्रेसमध्ये शिरून, काँग्रेसला फिरून जोरदार बनविण्याचा उद्योग त्यांनी सुरू केला. अॅनी बेझंट यांच्यासारख्या जगद्विख्यात विदूषीने भारतीय राजकारणाचा प्रश्न हाती घेतला असल्यामुळे, त्या प्रश्नाला आतां नव्या अर्थाने जागतिक मान्यता मिळेल हे ओळखून, त्यांनी बेझंटवाईंच्या चळवळीला पाठिंबा दिला. होमरूलच्या चळवळीने देशांत जागृति व संघटना होऊ लागली कांही तरी करावे लागणार असें वाटू लागल्यामुळे, हिंदुस्थानसरकारहि हलू लागले. पडद्याआड चाललेल्या या सरकारी हालचालींचा कानोसा लागतांच,वरिष्ठ कौन्सिलच्या १९ हिंदी सभासदांनी आपली स्वराज्यविषयक मागणीहि व्हाइसरॉय चेम्सफर्ड यांच्यामार्फत विलायतेस पाठविली

  • *Sedition Committee Report, 1918, p. 125. - Sedition Committee Report, 1918, p. 128. - Sedition Committee Report, 1918, p. 176-77; आणि

अ. ज. करंदीकर, लढाऊ राजकारण, पृ० १२४-२५.