पान:पाकिस्तानचे संकट.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाकिस्तानचे संकट साली मुस्लीमलीगनें साम्राज्यांतर्गत स्वराज्याला ध्येय म्हणून मान्यता दिली. त्याबरोबर जुन्या जमान्यांतल्या लीगपुढाऱ्यांना असे वाटले की, ठरलेल्या धोरणांत निष्कारण बदल होत असून, हिंदुस्थानांत 'अल्पसंख्य वर्ग' म्हणून वागणाऱ्या मुसलमानांच्या हिताला हा बदल बाधक ठरेल. काँग्रेसच्या ध्येयाशी लीगच्या ध्येयाचें बऱ्याच अंशी साधर्म्य होणार हे दिस् लागल्यावर थोड्याच काळांत, आगाखानांनी लीगच्या अध्यक्षपदाचे त्यागपत्र दिले. सभोंवार पसरलेल्या दाट निराशेतहि लो० टिळकांना जी थोडीं आशास्थानें दिसली त्यांत कांहीं मुसलमानांच्या वृत्तींत झालेला हा पालट हे एक आशास्थान होते, ही गोष्ट लोकमान्यांचे चरित्र इंग्रजी भाषेत लिहिणारे श्री० आठल्ये यांनी नमूद करून ठेविली आहे. - यद्धजन्य परिस्थितीचा फायदा घेऊन देशाची राजकीय प्रगति पदरांत पाड़न घेण्याची पूर्वतयारी टिळकांना हिंदुस्थानांत दिसली नाहीं; पण, अशी कांहीं अर्धीबोबडी, वेडीवांकडी तयारी युरोप-अमेरिकेंतल्या क्रांतिकारकांनी केली असली पाहिजे, असे दिसतें. १९०९च्या सुमारास बॅ० विनायकराव सावरकर हेच लंडनमधील इंडिया हाऊसमधल्या मंडळींचे सर्वमान्य पुढारी ठरले होते. त्यांना अटक झाली तत्पूर्वीच क्रांतिकारक पक्षाच्या कार्याचें जाळे फ्रान्स, जर्मनी, अमेरिका वगैरे देशांपर्यंत पोचलें होतें. लाला हरदयाळ यांनी १९११ सालापासून अमेरिकेंत बरीच जागृति केली होती. अमेरिकेंतून येणाऱ्या मॅव्हेरिक वगैरे बोटीतून जर्मनीकडून शस्त्रपुरवठा केला जाईल त्याचा बँकॉक, बटेव्हिया इत्यादि केंद्रांमार्फत उपयोग करून घेण्याचा कट बराच गुंतागुंतीचा होता. कोमागाटामारू प्रकरणाची हकीकत नीट तपासली तर तिच्यामागेंहि क्रांतिकारकांच्या धडपडी स्पष्टपणे दिसतात. या सर्व धडपडींचा निष्कर्ष म्हणून Sedition Committee च्या सभासदांनी पुढील उद्गार काढिले आहेत : The revolutionaries concerned were far too sanguine and the Germans with whom they got in touch were very

  • The Problem of Minorities by K. B. Krishna, p. 149. *Lokamanya Tilak by D. V. Athalye, p. 215. ŞSedition Committee Report, 1918, p. 8.