पान:पाकिस्तानचे संकट.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुसलमानांच्या मागण्यांचा क्रमविकास ___ मोर्ले-मिंटो सुधारणांच्या निमित्ताने मुसलमानांनी जी आग्रही वृत्ति धरली ती प्रभावशाली ठरल्यामुळे, लष्करी व मुलकी नोकऱ्या, प्रातिनिधिक संस्थांतली वजनदारी व वतनदारी इत्यादि बाबतींत मुसलमानांना विश्वास वाढू लागला. त्याबरोबर भोवतालच्या जगांतल्या घडामोडींकडे नव्या दृष्टीने पाहण्याची इच्छा त्यांना साहजिकपणेच होऊ लागली. इराण, अरबस्थान हे छोटेखानी मुसलमानी देश रशिया-इंग्लंड वगैरे जवरदस्त देशांच्या बुद्धिबळाच्या पटावरील प्याद्यांसारखे खेळविले जात आहेत, तुर्कस्थानवर संकट आले तर इंग्लंडने त्याला मदत करावयाची की काय हा प्रश्न इंग्लंडच्या सोईसवडीनुसार सुटत असतो, इत्यादि गोष्टी समजायला अगदी साध्या आहेत. मुसलमानांना त्यांचे आकलन आतां होऊ लागले. क्रिमियन युद्धापासूनच हिंदी मुसलमानांचा तुर्कस्थानविषयक आपलेपणा व्यक्त होऊ लागला होता. प्रवासाची व दळणवळणाची साधने वाढल्यामुळे, उत्तर हिंदुस्थानांतल्या मुसलमानांचे बाहेरच्या जगाकडे-विशेषत: बाहेरच्या इस्लामी जगाकडे--अधिकाधिक लक्ष लागत चालले होते. ब्रिटिश साम्राज्याची धोरणे बदलली नाहीत तर आशिया व युरोप या दोन खंडांतल्या मुसलमानांचा दर्जा हीन ठरेल अशी भीति कांही लोकांकडून व्यक्त केली जात होती.* या सर्व प्रदेशांतल्या मुसलमानांच्या आशाआकांक्षा कांहीं बाबतींत सारख्याच धोरणाने खेळत असतात हे दूरदर्शीपणाने हेरणाऱ्या लो० टिळकांसारख्या अव्वल दर्जाच्या मुत्सद्याने १९०३ सालींच असें भविष्य वर्तविले होते की, अफगाणिस्थानपासून तुर्कस्थानपर्यंत जी महंमदानुयायी राष्ट्रे आहेत त्यांचे ऐक्य कधीकाळी होणे असंभवनीय नाही. ___ नुसत्या धार्मिक दृष्टीने का होईना, हिंदी मुसलमानांनी जगाच्या वाढत्या गुंतागुंतीकडे पाहण्याला सुरुवात केली; त्याबरोबर, हिंदी सरकार व ब्रिटिश सरकार यांची मनधरणी करून नोकऱ्यांचे व मानमान्यतेचे तूप आपल्याच रोटीवर ओढून घेण्यापलीकडे काहीतरी केले पाहिजे, हे त्यांच्यापैकी कांहीं जणांना कळं लागले. बंगालची फाळणी १९११ सालीं रद्द होऊन, हिंदंची चळवळ यशस्वी झाली असा त्यांचा ग्रह झाला होता. १९१३ '*Sedition Committee Report, 1918, p. 173. लो० टिळकांचे केसरीतील लेख, राजकीय खंड २, पृ० ४४०.