पान:पाकिस्तानचे संकट.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाकिस्तानचे संकट मंदावल्यामुळे, यापुढील काही वर्षे राजकारण फारच घरंगळल्यासारखे झाले. . नव्या सुधारणांनी लोकमत संतुष्ट झाले नव्हतें हे जगाला कळवावे म्हणूनच की काय, कांहीं दहशतवादी लोकांनी आपले उद्योग चालू ठेविले होते. १९०९ च्या अखेरीस लॉर्ड मिंटो अहमदाबादेस गेले असता, त्यांच्या गाडीवर बाँब फेंकण्याचा प्रयत्न झाला. नाशिक कटांतील आरोपींवरचे खटले, विनायकराव सावरकरांचे प्रकरण, बंगालमधील अत्याचार व कटवाल्यांवरील खटले, मद्रास भागांत व्ही. व्ही० एस० आयर यांनी चालविलेली संघटना व तिनेवेल्लीच्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटचा खून इत्यादि प्रकारहि वातावरणांत प्रक्षोभ उत्पन्न करीत होते. १९११च्या दिल्ली दरबारने लोकांची मनें कांहीं वेळ आकृष्ट करून घेतली व बंगालची फाळणी रद्द केल्याची घोषणा या प्रसंगी करण्यांत आल्यामुळे, लोकमतावर थोडा अनुकूल परिणाम झाला. पण, हा परिणाम तात्पुरताच होता; कारण, १९१२च्या अखेरीस दिल्ली शहरांत खुद्द व्हाइसरॉय लॉर्ड हार्डिज यांच्यावर बॉब टाकण्यात आला. या अपेशी प्रयत्नांतून निर्माण झालेलें कटाचे लफडे पुढे पुष्कळच दिवस टिकले. देशांतल्या राजकारणी कर्तृत्वाला आलेला निराशाजनक सुस्तपणा परमावधीला पोंचला होता. लोकमान्य टिळक मंडालेहून मुक्त होऊन परत आले. १९१४ चें महायुद्ध सुरू झालें. भोंवतालची परिस्थिति टिळकांना कशी भासली याचे वर्णन त्यांच्या आठवणी व आख्यायिका' महाराष्ट्राला पुरविणारे श्री०स०वि० बापट यांनी त्यांच्याच शब्दांत दिले आहे. आपल्या नव्या सावधपणाच्या धोरणाला नांवें ठेवणाऱ्या स्नेह्यांना उद्देशन टिळक म्हणाले : "माझ्या पश्चात् सहा वर्षांत जर सर्व मतवत झाले नसते, कांहीं तयारी केली असती तर हा प्रसंग माझ्यावर कां येता? सहा वर्षांत यांनी काही कामगिरी करून दाखविली असती तर, हल्लीच्या लढाईचा योग्य फायदा घेऊन, कोणाची वाट न पाहतां, हातांत बंडाचे निशाण घेऊन मीच पुढे झालो असतों !"* *लो. टिळक यांच्या आठवणी व आख्यायिका, खंड १, भाग १, पृ० २२८