पान:पाकिस्तानचे संकट.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुसलमानांच्या मागण्यांचा क्रमविकास असेल याची काही कल्पना ने० ना० शास्त्री यांच्या एका कथितावरून होऊ शकते. मुसलमानांचे स्वतंत्र मतदारसंघ मान्य करणार नसाल तर सुधारणा देण्याची भाषाच बंद करा असें मोर्लेसाहेबांना बजावण्यांत आले असावें. ने ना० शास्त्री लिहितात : Lord Morley, unable to resist the pressure put upon him was faced with the necessity either of introducing the reforms with this principle of separate electorates, disfiguring and taking away from their worth or giving up the whole show. Now, like a man of compromise, the doctrinaire and honest John surrendered his principle. ** (मोर्लेसाहेबांवर विलक्षण दडपण टाकण्यात आले व त्याला पुरून उरण्याची शक्यता त्यांना दिसेना. सुधारणा योजनेला छिन्नभिन्न व निःसत्त्व करून टाकणारे स्वतंत्र मतदारसंघ मान्य करून ती योजना मांडा, नाही तर सगळी योजनाच फेकून द्या असें बजावण्यांत आल्यामुळे, मोलेसाहेबांवर बिनतोड प्रसंग आला! जॉन मोर्ले हा भला माणूस ; एरवी तत्त्वाला मोठा ताठर; पण, राजकारणांतली तडजोड म्हणून त्याने या प्रसंगी तत्त्व गुंडाळून ठेविलें). स्वतंत्र मतदारसंघ अर्थात् मुसलमानांचे जातवार मतदारसंघ कै० ना० गोखले यांना मान्य होते की काय, मोर्ले-मिंटो सुधारणांतल्या या विषबीजाला त्यांचा आशीर्वाद मिळाला होता की काय या प्रश्नाची चर्चा महत्त्वाची आहे. हे विषबीज नष्ट होत नाही हे दिसू लागल्यावर गोखले यांनी नाइलाज म्हणन त्याच्यापुढे मान वांकविली असली तरी, त्यांची त्याला तात्त्विक मान्यता मुळीच नव्हती. ज्या घातकी तत्त्वाला मोर्लेची देखील तत्त्वतः मान्यता नव्हती त्याला गोखले कशी संमति देतील? ही ब्याद टळत नाहीं असें दिसल्यावर त्यांनी ती सहन केली असेल! मोर्ले-मिंटो सुधारणांच्या घडणीसाठी त्यांनी इतके परिश्रम घेतले होते की, 'स्वतोक पितरां रुचे, जरिहि कर्दमी रांगले' या न्यायाने, सुधारणांबरोबर या जातवारीचा मळहि त्यांनी आपद्धर्म म्हणून मान्य केला असेल. पण, हा मळ राजकारणांत शिरूं नये ___*Life of Gokhale by the Rt. Hon. Srinivas Sastri, p. 106..