पान:पाकिस्तानचे संकट.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

5) पाकिस्तानचे संकट का आपले मत हिंदुस्थान सरकारला कळविलें. स्वतंत्र मतदारसंघांमुळे राष्ट्रीयत्वाची होणारी हानि टळावी म्हणून मुसलमानांना संयुक्त मतदारसंघांत जागा राखून ठेवण्याची सूचना मोर्ले यांजकडून करण्यांत आली. पण, हिंदुस्थान सरकारच्या सेक्रेटरिएटमधल्या मिरासदार सनदी नोकरांनी मोलेसाहेबांच्या या सूचनेला सुरुंग लावण्याचे ठरविले. सर हरबर्ट रिस्ले प्रभृतींनी मुसलमानांच्या नाकांत काड्या घातल्या व त्यांना मोर्लेच्या सूचनेविरुद्ध खूप चळवळ करावयाला लाविले. मोलेसाहेब भलतेंच काही तरी करून टाकतील तें टळावे म्हणून आगाखान व अमीरअल्ली ही जोडी विलायतेस रवाना झाली.* संयुक्त मतदारसंघ मुसलमानांना मान्य नाहीत हे दर्शविण्यासाठी तशा अर्थाच्या पत्रकावर खूप सह्या घेण्याचे काम सुरू करण्यांत आले. मुसलमानांचे स्वतंत्र मतदारसंघ मान्य करण्याला मोर्ले यांचा तत्त्वतः तीव्र विरोध असला पाहिजे हे अलीकडे प्रसिद्ध झालेली कागदपत्रे, चरित्र इत्यादींवरून उघड होत आहे. ६-१२-१९०९ रोजी गव्हर्नर जनरल लॉर्ड मिंटो यांना लिहिलेल्या पत्रांत मोर्लेसाहेबांनी पुढील उद्गार काढले आहेत: I won't follow you again into our Mahomedan dispute. Only I respectfully remind you once more that it was your early speech about their extra claims that first started the Moslem hare.Ť ' (मुसलमानांच्या विषयींच्या वादग्रस्त प्रश्नांत आपल्या मागोमाग फरपटत येण्याची माझी इच्छा नाही. पण, मी तुम्हांला नम्रतापूर्वक फिरून आठवण करून देतों कीं, मुसलमानांच्या जादा अधिकारांना मान्यता देणारे भाषण प्रारंभींच करून तुम्ही त्यांना निष्कारण चालना दिलीत.) हिंदुस्थानांतली नोकरशाही किती मुसलमानधार्जिणी बनली असेल व आगाखान-अमीरअल्ली प्रभृतींच्या जादूच्या खेळामुळे पार्लमेंटच्या सभासदांवरहि किती मोहनी पडली *Morley's Recollections, Vol. II, p. 325. २७-१-१९०९ रोजी मि. अमीरअल्ली प्रभृति मंडळी मोर्लेसाहेबांना भेटली. मुसलमानांचे राजकीय व लष्करी महत्त्व यांना साजेल असें प्रतिनिधित्व अशी समाधानकारक प्रतिनिधित्व' या शब्दप्रयोगाची फोड त्यांनी post. Indian Statutory Commission, Vol. I, Survey, p. 186.