पान:पाकिस्तानचे संकट.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४८ पाकिस्तानचे संकट म्हणून त्यांनी फार खटपट केली. स्वतंत्र मतदारसंघाचे दुष्परिणाम शक्य तोंवर कमी व्हावे या हेतूने त्यांनी एक विधायक योजनाहि मांडली होती. लोकसंख्येच्या प्रमाणांत मुसलमानांना न्यायतः किती जागा मिळाल्या पाहिजेत हे प्रथम ठरवावें, ही संख्या ठरल्यावर निवडणुकी करावयाच्या त्या प्रादेशिक, सर्वसामान्य मतदारसंघांतर्फे कराव्या, या निवडणुकीत मते देणारे मतदार जसे हिंदु-मुसलमान सगळे असावयाचे त्याप्रमाणेच उमेदवारहि सगळ्या जातीजमातींचे असावे, निवडणुकीचा निकाल झाला की या पद्धतीने मसलमान किती निवडून आले आहेत हे पहावे आणि मुसलमानांच्या ठरलेल्या संख्येच्या मानाने ही संख्या कमी भरली तर, संख्याभरपाईसाठी जी नवी निवडणूक होईल ती मात्र मुसलमान उमेदवार व मुसलमानच मतदार या पद्धतीने व्हावी अशा काही तरी तपशिलाची एक योजना नागोखले यांनी त्या वेळी प्रचारिली होती.* गोखले यांना स्वतंत्र मतदारसंघ संमत नव्हते; लोकसंख्येच्या प्रमाणांत मिळणाऱ्या जागांपलीकडे मुसलमानांना कांहींहि देण्याचे कारण नाहीं असें त्यांचे मत होतें, इत्यादि गोष्टी ने० ना० शास्त्री यांच्या लिहिण्यावरून स्पष्ट ठरत आहेत... स्वतःला गोखल्यांचे शिष्य म्हणविणाऱ्या गांधीजींनी आपल्या का गुरूनें स्वतंत्र मतदारसंघ मान्य करून चूक केली असें एका परक्या स्त्रीसमोर हंसत हंसत मान्य करावें ही गोष्ट, हा 3 पुरावा पुढे असल्यामुळे, मोठी उद्वेगजनक वाटते. पण, गांधीजींनी आपल्या गुरूला बाधक ठरणारी ही कबुली गुरूची स्तुति करतां करतां दिली, याबद्दल शंका वाटण्याचे कारण नाही. गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेला गेले तेव्हां त्यांची व मेरी मिंटो यांची भेट झाली. त्या प्रसंगींचा एक संवाद मेरी मिंटो यांनी आपल्या जर्नलमध्ये दिला आहे. तो संवाद असा : th मेरी मिंटो:--गांधीजी, तुमचे पुढारी व तुमच्या आधींचे नेते जीपणाम गोखले यांनीच स्वतंत्र मतदारसंघाची योजना सुचविली होती, हे तुम्ही विसरून गेलांत वाटतें! . *Life of Gokhale by the Rt. Hon. Srinivas Sastri, p. 107.