पान:पाकिस्तानचे संकट.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुसलमानांच्या मागण्यांचा क्रमविकास अशा सीध्या पद्धतीने प्रयत्न करण्याची नव्हती. परदेशांत राहणारे क्रांतिवादी व हिंदुस्थानांतील क्रांतिवादी यांचे दळणवळण सुरू होऊन राजकीय प्रचाराची नवीं तंत्रे व साधनें हिंदुस्थानपर्यंत पोंचू लागली होती. १९०७ च्या शेवटी अॅलन नांवाच्या बंगालमधल्या सरकारी अधिकाऱ्यावर गोळी झाडण्यात आली. ३०-४-१९०८ रोजी खुदीराम बोस या तरुणानें उडविलेल्या बाबमुळे, मिसेस केनेडी व त्यांची मुलगी अशा दोन स्त्रिया मरण पावल्या. मुझफरपूरचे न्यायाधीश मि० किंग्जफोर्ड यांच्यावर खुदीरामचा रोख होता; पण, योगायोगाने या स्त्रियाच मृत्युमुखी पडल्या! या प्रकारानंतर तपासाची चक्रे खूप जोराने फिरूं लागली व 'माणिकतोळा बाग प्रकरण' या नावाने प्रसिद्ध असलेला कटच्या कट उघडकीस आला. लालाजीप्रभृतींना नुसत्या संशयावरून हद्दपार केलें; मग, या कटवाल्यांना काय शिक्षा झाल्या असतील हे काय सांगायला पाहिजे? या बॉब प्रकरणांतील लेखांमुळे लोकमान्य टिळकांना सहा वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा सांगण्यांत आली व काळकर्ते प्रा० शिवरामपंत परांजपे यांना याच प्रकारच्या लेखांबद्दल १९ महिने सक्तमजुरीची शिक्षा सांगण्यात आली. सावरकर बंधूंपैकी वडील बंधु गणेशपंत यांनी प्रसिद्ध केलेल्या कांहीं कवितांचे निमित्त करून सरकारने त्यांना ९-६-१९०९ रोजी जन्मठेप काळ्यापाण्याची शिक्षा सांगितली. जागृत झालेले देशभक्त अशा दडपशाहीने दबत नाहीत हे जगाला पटवून देण्यासाठींच की काय, या शिक्षासत्राच्या मागोमाग, मदन लाल धिंग्रा यांनी खुद्द लंडनमध्ये कर्झन वायलीवर पिस्तूल झाडून त्याचा खून केला. २१-१२-१९०९ रोजी नाशिकच्या विजयानंद नाटकगृहांत कलेक्टर जॅक्सन यांचा खून अनंत कान्हेरे यांनी केला! मार हिंदु देशभक्तांनी सत्तासंपादनासाठी व देशविमोचनासाठी जे विविध प्रकारचे प्रयत्न चालविले होते ते सगळेच सर्वांना पटतील असे नाही. निराशेच्या पोटी जन्मलेली धडपड असेंच या प्रयत्नांना कोणी म्हटले तरी इतिहास म्हणून त्यांचे महत्त्व कमी मानतां येणार नाही. या विविध प्रकारांपैकी कोणत्याच प्रकारांत मुसलमान मनोभावें सामील झाले नव्हते, हे मात्र खरें. अरेरावी कारभारामुळे सगळा देश कर्झनसाहेबांना दूषणे देत होता; तर अलीगड कॉलेजचे मुसलमान व्यवस्थापक कर्झनसाहेबांना मानपत्र देण्यात