पान:पाकिस्तानचे संकट.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४४ को पाकिस्तानचे संकट पुरुषार्थ मानीत होते.* वंगभंगामुळे निर्माण झालेला असंतोष ब्रिटिश मालावरील बहिष्काराच्या रूपाने व्यक्त होत होता तर या बहिष्काराची चळवळ बारगळावी म्हणून बंगालमधील मसलमान दंगेधोपे करण्यांत गढून गेलेले होते. प्रचंड चळवळ चाल झाली आहे व सरकारकडून दडपशाहीचे धोरणहि अवलंबिले जात आहे; त्या अर्थी सरकारच्या घट्ट मुठीतून काही तरी अधिकार आतां लौकरच सुटणार हे त्यांनी हेरले होते! या अधिकारांत आपला जातीय हात जास्तीत जास्त घुसवून आपले महत्त्व कसे वाढवावयाचे इकडे मात्र मुसलमानांचे पूर्ण लक्ष होतें. आगाखान, अमीरअल्ली वगैरे मुसलमान पुढारी लवकरच इंग्लंडमध्ये गेले व तेथे तळ देऊन बसले. हे पुढारी आपले घोडे पुढे दामटण्यांत किती कुशल असत हे एका प्रसंगाच्या हकीकतीवरून लक्षात येण्यासारखे आहे. या वेळचा सुधारणा कायदा घडवितांना मोलेसाहेबांनी कै० ना० गोखले यांच्याशी विचारविनिमय केला होता, ही गोष्ट खरी आहे. या गोष्टीचा विपर्यास करून मुसलमान पुढाऱ्यांनी उमराव सभेतल्या (House of Lords) प्रतिष्ठितांचे कान फुकले! मोर्लेसाहेबांनी या सभेत सुधारणांची रूपरेषा विशद केली, त्याबरोबर समोरच्या उमरावांकडून त्यांच्यावर टीकेची झोड सुरू झाली. संकल्पित सुधारणा भयंकर क्रांतिकारक स्वरूपाच्या आहेत हा आक्रोश तर सगळ्यांनी केलाच. पण, सगळ्यांच्या पोटांतला खरा राग असा होता की, एका धर्त दक्षिणी हिंदूच्या दुष्ट प्रभावामुळे या सुधारणांचा जन्म होत आहे ! मुसलमानांना तळहातावरच्या फोडाप्रमाणे संभाळण्याची आपण इतकी शिकस्त करतों तरी आपल्यावर असा भडिमार होतो हे पाहून मोर्लेसाहेबांना सहजच दु:ख वाटले व त्यांनी समोरच्या शिष्टांना सांगितलें: PM 2. I have consulted Mohammedans as well and these are the results of the talks I have had. S POR TS (मी मुसलमानांचाहि विचार घेतला आहे आणि सुधारणांची योजना ही त्या विचारविनिमयांतून निर्माण झालेली आहे).

  • लो० टिळकांचे राजकीय लेख, खंड २, प० २३३.

1Sedition Committee Report 1918, p. 19. $17.ŞLife of Gokhale by the Rt. Hon. Sastri, p. 64. 3