पान:पाकिस्तानचे संकट.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुसलमानांच्या मागण्यांचा क्रमविकास ४१ ७ पुरस्कार करीत आणि स्वदेशी धंद्यांना सरकारने संरक्षण द्यावें असें म्हणत. स्वदेशी धंद्यांना संरक्षण देण्याचा स्वाधीनचा मार्ग म्हणून बहिष्काराचा पुरस्कार होऊ लागला. नेभळेपणा व स्वाभिमानशून्यता यांपासून भावी पिढीची मुक्तता व्हावी यासाठी राष्ट्रीय शिक्षणाच्या संस्था अस्तित्वात येऊ लागल्या. Trumpet Voice of India (भारताची रणभेरी) या पदवीला पात्र ठरलेले सर सुरेंद्रनाथ बानर्जी यांनी सारा देश हलवून सोडला. बिपिनचंद्र पाल यांनी मद्रास प्रांतांत चळवळीची आग भडकविली. वातावरणांत कांहीं तरी नवी हवा खेळं लागली आहे असें पंजाबमधील लोकांनाहि भास लागले* : किचनेरशी बेबनाव होऊन कर्झनशाहानी १९०५ च्या ऑगस्टमध्ये राजीनामा दिला व त्यांच्या जागी लॉर्ड मिंटो यांची नेमणूक झाली. याच सुमारास इंग्लंडमध्ये उदारमतवादी मंत्रिमंडळ अधिकारावर येऊन लॉर्ड मोले यांची भारतमंत्रिपदावर नेमणूक झाली. सरकारचे धोरण व जनतेतील चळवळ यांच्या मानाने काँग्रेसच्या धोरणांत बदल करण्याची भाषा सुरू झाली. पण, काँग्रेसमधल्या वजनदार व 'स्थितप्रज्ञ' मंडळींना ही भाषा रुचेना. १९०६च्या कलकत्ता काँग्रेसमध्येच हे पक्षभेद व मतभेद वास्तविक विकोपास जावयाचे; पण, महर्षि दादाभाई नौरोजी यांची अध्यक्षस्थानी योजना झाल्यामुळे हा प्रसंग टळला. 'स्वराज्य' हे साध्य आणि राष्ट्रीय शिक्षण,स्वदेशी, बहिष्कार वगैरे साधने या गोष्टी उघड बोलल्या जाऊ लागल्या. १९०७ च्या सुरत काँग्रेसमध्ये कलकत्ता येथील ठरावांच्या मानाने माघार घेतली जाईल, अशी भीति नव्या पक्षाला वाटू लागली. नव्या जुन्या मंडळींमधले संबंध संशयग्रस्त मनोवृत्तीमुळे दुरावले होते आणि त्यामुळे सुरतच्या काँग्रेसमध्ये बखेडा माजला, तो स्वाभाविकपणेच माजला...' 27 जपानसारख्या टीचभर राष्ट्राने १९०५ साली रशियाचा पराभव केला. या गोष्टीचा स्वातंत्र्येच्छु हिंदी लोकांच्या मनावर फार उत्साहवर्धक परिणाम झाला. बलशाली युरोपियन राष्ट्रांपुढे आशियांतल्या लोकांचे कांहीं चालत नाहीं या समजुतीला जपानच्या विजयामुळे धक्का बसला व आशियाच्या उत्कर्षाच्या आशांचे जपान हे एक केंद्र बनले. अमेरिकेने इंग्लंडची सत्ता

  • Sedition Committee Report 1918, p. 141. 0.3.