पान:पाकिस्तानचे संकट.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाकिस्तानचे संकट तरुणांच्या वृत्तीला एक नवेंच वळण लागत होते व सुशिक्षितांमधला असंतोष चौफेर पसरत होता. या TEST - सप्तजिव्ह अग्नीप्रमाणे हा अनेकजिव्ह असंतोषहि मोठा दाहक होता ! पण, मुसलमानांना राजी राखले म्हणजे हा असंतोष दडपून टाकितां येईल . अशा घमेंडीत राहून, नोकरशाहीने दडपशाहीचा अवलंब करण्याचे ठरविले. मुसलमानांची मनधरणी करण्याचे सरकारी धोरण कोणत्या । थरापर्यंत जाऊ शकतें याविषयींची या काळांतली कांही उदाहरणे नमूद करण्यासारखी आहेत. विजयादशमीच्या दिवशी नागपूरकर भोसल्यांची स्वारी शहरांतून मिरवणुकीने निघावयाची ही वहिवाट पुरातन असून, तिच्यावर कसला निबंध घातल्याचा दाखला १९०३ पर्यंत नव्हता. मशिदीपाशी वायें न वाजविण्याचा निबंध १९०३ साली घालण्यात आल्यामुळे, त्या सालची मिरवणूक निषेध म्हणून बंदच ठेवली गेली ! पूर्व बंगालचे लेफ्टनंट गव्हर्नर' सर बॅम्फील्ड फुल्लर यांचें मुसलमानांना फूस देण्याचे धोरण स्पष्ट झाल्यामुळे त्या भागांत मुसलमानांची दंडेली हा एक मामुली विषय होऊन बसला. कै० सर सी० वाय० चिंतामणी यांनी आपल्या ग्रंथांत * नमूद केलेली या प्रकाराची कांही उदाहरणे तर अशी आहेत की, त्यांच्या खरेपणावर माणसाचा एकाएकी विश्वासहि बसू नये! खटल्यांतल्या साक्षीदारांचे हिंदू व मुसलमान असे वर्ग पाडावयाचे आणि मुसलमानांच्या म्हणण्यावर, ते मुसलमान आहेत एवढ्याचसुळे, जास्त विश्वास ठेवावयाचा असा प्रघात एका सेशन्स जज्जाने पाडला ! बंगालची फाळणी करण्याचा आपला निश्चय कर्झनसाहेबांनी १९०५ च्या मध्याला जाहीर केला. त्यांचा हेतु चळवळया बंगाली हिंदूंचे बळ विभक्त करणे हा होता. केवळ कारभाराच्या सोईसाठी काही योजना आखण्याचे त्यांच्या मनांत असते तर विभागणीची पद्धत व वागण्याची पद्धत या दोहोंतहि त्यांना पुष्कळ फरक करतां आला असता. पूर्व बंगालचे जिल्हे व आसाम यांचे पाय एकत्र गुरफटविण्यांत हेतु असा होता की, पूर्व बंगालमधल्या बहुसंख्य मुसलमानांच्या संख्याबलाच्या मानाने त्या भागांतले हिंदु दुबळे ठरावे ! बंगालच्या फाळणीमुळे--अर्थात् वंगभंगामुळे-जी चळवळ झाली ती राष्ट्रीय चळवळीच्या इतिहासांत संस्मरणीय आहे. आजपर्यंत लोक नुसते स्वदेशीचा

  • Indian Politics since the Mutiny, p. 57. weidid **