पान:पाकिस्तानचे संकट.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काही पाकिस्तानचे संकट झालेले १५३-अ कलम १८९८ साली पीनल कोडमध्ये समाविष्ट करण्यांत आले. निवारजन र __हिंदुस्थानची राजकारणी परिस्थिति अशा प्रकारची असतांना, १८९९ साली लॉर्ड कर्झन यांची गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली. आशियामधील साम्राज्यविषयक प्रश्न आपल्याला उत्तमच कळतात अशा तोऱ्यांत वागणाऱ्या या कट्टर साम्राज्यशाही मुत्सद्याने पुढील ५-६ वर्षांत असा धुमाकूळ माजवून दिला की, टीकेचे शब्द अगदी तोलनजोखून वापरण्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या कै० ना० गोखल्यांनाहि त्याची औरंगजेबाशी तुलना करावी लागली. १९०५ सालीं बनारसला भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून गोखले यांनी में भाषण केले त्यांत कर्झनशाहीच्या स्वरूपाचे व परिणामांचें मार्मिक वर्णन केलेले आहे. गोखले म्हणाले : How true it is that to everything there is an end ! Thus, even the Viceroyalty of Lord Curzon has come to a close ! For seven long years, all eyes had constantly to turn to one masterful figure in the land—now in admiration, now in astonishment, more often in anger and in pain, till at last it has become difficult to realize that a change has really come ! For a parallel to such an administration we must, I think, go back to the times of Aurangzeb in the history of our own country. मायामा (व्हाइसरॉय म्हणून कारभार करण्याची कर्झनची मुदत एकदांची संपली हे पाहिले म्हणजे, भल्याबुऱ्या प्रत्येक गोष्टीला शेवट हा असतोच या सत्त्यावर विश्वास बसू लागतो! सात संवत्सर म्हणजे कांहीं थोडा काळ नाही! या काळांत, कोट्यवधि लोकांच्या या देशांत सगळ्यांचे डोळे सतत एकाच जबरदस्त व्यक्तीकडे वळलेले होते! या दृष्टींत कधी कौतुकाचा भाव असे, कधी विस्मयाचा भाव असे; पण, राग आणि दुःख हेच भाव फार वेळां असत ! सात वर्षांच्या या संवयीचा परिणाम असा झाला आहे की, कारभारी पालटला हे सत्य मनाला पटणेच दुस्तर झालें आहे ! मला वाटते की, अशा कारभाराची तुलनाच करावयाची तर आपल्याला आपल्या इतिहासांतल्या औरंगजेबा कडेच वळावे लागेल.)