पान:पाकिस्तानचे संकट.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुसलमानांच्या मागण्यांचा क्रमविकास ३७ मुसलमानांनी लोकांच्या डोळ्यांदेखत जुने खेटर व धोंडे पालखीवर मारले. १८९५ च्या पावसाळयांत धुळ्याच्या मुसलमानांनी खुद्द सरकारी अंमलदारांशीच मारामारी केली! इकडे हिंदुस्थानांत मुसलमान असे अनन्वित प्रकार करीत होते तर त्याच वेळी इंग्लंडमध्ये तळ देऊन राहिलेले त्यांचे साहाय्यक तेथील लोकांना विपर्यस्त माहिती पुरवीत होते. मुसलमानांच्या असंतोषाची जबाबदारी चळवळया हिंदूंवरच आहे हा ग्रह इंग्लंडमध्ये पसरविला जात होता व या समजुतीच्या आहारी गेलेले सर वुइल्यम हंटर 'लंडन टाइम्स'मध्ये मुसलमानांची तरफदारी करीत होते. मुसलमानांची दंगेखोरपणाची वृत्ति नुसत्या मुंबई भागांतच नाचत होती असे नाही. पोरबंदर, कलकत्ता वगैरे ठिकाणींहि या वृत्तीचा स्फोट झाला होता. रँड-आयर्स्ट यांच्या खुनाच्या पुढच्याच वर्षी मुसलमानांनी मुंबईत दंगा केला. । हिंदुस्थान सरकारचे लष्करी धोरण,आशिया खंडांतल्या ब्रिटिश वर्चस्वाला उत्पन्न होऊ पाहणारा जपान हा नवा प्रतिस्पर्धी, हिंदी लष्करांतलें मुसलमानांचें स्थान व बदलत्या परिस्थितीमुळे वाढत्या लष्कराची लागणारी जरुरी या सर्व गोष्टींचा मेळ घातला म्हणजे या कालखंडांत सरकारी धोरण मुसलमानांना खूष करण्याकडे कां कललेलें होतें याचा उलगडा उत्तम प्रकारे होतो. १८९५ साली चित्रळवरील मोहिमेंत चौदा हजार सैन्य गुंतवावे लागले होते. इराणच्या बाजूला रशियाच्या सूचक हालचाली चालत असल्याचा बोभाटा होताच! रशियाला पायबंद घालावयाचा म्हणजे वाढती लष्करी सिद्धता अपरिहार्यच होती. चीन-जपानचे युद्ध संपून त्यांत जपान विजयी झाल्यामुळे व जपानी राष्ट्र हे चीन-हिंदुस्थानप्रमाणे झोपाळू नाही हे इंग्रजांना चांगले माहीत झाले असल्यामुळे, या संभाव्य प्रतिस्पर्ध्याच्या भयानेंहि लष्करी सामर्थ्याकडे लक्ष देणे प्राप्तच होते. आशियामधील साम्राज्याच्या स्थैर्याच्या दृष्टीने लष्करी सामर्थ्याची वाढ करणे अवश्य असल्यामुळे, राजनिष्ठेबद्दल प्रसिद्धीस आलेल्या मुसलमानांना संतुष्ट ठेवणे हे इंग्रजांच्या दृष्टीने क्रमप्राप्तच होतें. मुसलमानांच्या दांडगाईमळे अस्वस्थ झालेल्या हिंदूंनांच विशेषत: त्रासदायक

  • लो. टिळकांचे केसरीतील लेख, राजकीय खंड पहिला, पराचा कावळा, लेखांक १-२.