पान:पाकिस्तानचे संकट.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाकिस्तानचे संकट कार्य निसर्गानेच केलें! वारंवार पडं लागलेल्या दुष्काळांमुळे गरीब रयत कष्टी झाली व ती नव्या राज्यव्यवस्थेला नांवें ठेवू लागली! इतक्यांत प्लेगच्या साथीनें कहर उसळन दिला. तरणी-ताठी माणसें तडकाफडकी मरूं लागली ! कर्ती माणसेंच दगावल्यामुळे कुटुंबेंच्या कुटुंबें हवालदील होऊ लागली! प्लेगप्रतिबंधक उपायांची अंमलबजावणी अशा कडक रीतीने होऊ लागली की, या त्रासापेक्षां प्लेगनें मरण आलेले पत्करलें, असें लोकांना वाटू लागले! या उपायांची अंमलबजावणी करणारा अधिकारी रँड फारच अप्रिय झाला! व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाचा हीरक महोत्सवसमारंभ २२ जून १८९७ रोजी साजरा होणार आहे या गोष्टीचे टिपण साधून, प्रसिद्ध चाफेकर बंधूंपैकी दामोदरपंत यांनी पिस्तूल झाडून रँड व आयर्ट या साहेबांचा खून केला! राजकीय असंतोष प्रकट करण्याच्या या नव्या पद्धतीचे पडसाद हिंदुस्थानच्या सांदी-कोपऱ्यांतहि उमटले. इतकेंच. नव्हे तर, ते सातासमुद्रापलीकडेहि जाऊन पोंचले! - चांदीच्या भावांतली अस्थिरता, चलनाबाबतचे सरकारचे धरसोडीचें धोरण, टांकसाळी बंद करून सरकारने दाखविलेली अनास्था इत्यादि प्रकार याच सुमारास घडल्यामुळे व त्यांचे अनिष्ट परिणाम व्यापार व शेतकी या दोन्ही महत्त्वाच्या धंद्यांवर होऊ लागल्यामुळे, असंतोषाची कक्षा चांगलीच ऐसपैस वाढू लागली. देशांत नव्याने सुरू झालेल्या देशी कापडाच्या धंद्याला संरक्षण मिळाले तरच तो धंदा परदेशी कापडाशी होणाऱ्या स्पर्धेत तग धरूं शकेल ही व्यापारी वर्गाची रास्त मागणीहि सरकारने मानली नाही. असंतोष वाढण्याला हीहि गोष्ट कारणीभूत झाली. या सुमारास आफ्रिकेंत सुदानवर केलेल्या स्वारीचा खर्च इंग्लंडनें हिंदुस्थानवर लादला. याहि गोष्टीचा खप बोभाटा झाला. नाना को मुसलमानांच्या वाढत्या चढेलपणामुळे हिंदुसमाज त्यांच्या मोहरमासारख्या सणांत सामील होईनासा झाला व गणेशोत्सवासारखे सार्वजनिक उत्सव अखिल हिंदूंच्या संघटनेचे कार्य करूं लागले. मुसलमान समाजांतली दंडेली प्रसंगी कोणत्या थरापर्यंत जात असे याचे उदाहरण म्हणून १८९४ साली पुण्यांत घडलेली एक गोष्ट सांगण्यासारखी आहे. वार्षिक वहिवाटीप्रमाणे श्री ज्ञानेश्वर-तुकाराम महाराजांच्या पालख्या शहरांतून मिरवत जात असतां,