पान:पाकिस्तानचे संकट.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मानली प्रकरण ४ थेंब मुसलमानांच्या मागण्यांचा क्रमविकास ___टप्पा दुसरा : १८९२ ते १९२० विगत चार १८९२ चा कौन्सिलसुधारणेचा कायदा व प्रांतांतून द्विदलराज्यपद्धतीचा प्रारंभ करणारा माँटफर्ड सुधारणांचा कायदा यांच्या दरम्यान जो पावशतकाचा अवधि लोटला त्यांतील महत्त्वाच्या घडामोडी आणि त्यांत मुसलमानांच्या मागण्यांची झालेली वाढ यांचा विचार नीटपणी करण्यासाठी या कालखंडाचे काही भाग पाडणे सोइस्कर होईल. कर्झनशाहीची सुरुवात होईपर्यंतच्या वर्षांचा एक खंड पडतो. कर्झनशहांच्या कारकीर्दीला स्वतंत्र खंड मानण्याइतके महत्त्व देणे प्राप्त आहे. मोर्ले-मिंटो सुधारणांच्या वाटाघाटींचा व अंमलबजावणीच्या सुरुवातीचा काळ स्वतंत्र खंड म्हणून विचारांत घेण्यासारखा आहे. महायुद्धकालीन घडामोडी, माँटफर्ड सुधारणांचा ऊहापोह आणि त्या सुधारणांची फलश्रुति या सर्वांचा मिळून विचार शेवटच्या कालखंडांत होण्यासारखा आहे. ही निगरानी __कौन्सिलसुधारणेचा कायदा झाल्यानंतर पुढच्याच वर्षी मुंबई शहरांत पहिला मोठा जातीय दंगा घडून आला. नाशिक जिल्हयांत येवलें मुक्कामी याच वर्षी झालेला दंगा वर्षभर धुमसत राहिला. धार्मिक भावना दुखविल्या जातात या काल्पनिक समजुतीनेंहि मुसलमान बेभान बनतात अशी सबब सांगणाऱ्या सरकारकडून हिंदूंच्या रास्त अधिकारांवर आक्रमण सुरू झाले. मुसलमानांच्या या नव्या वृत्तीची चर्चा सुरू झाली व हिंदुसमाजांत -सुप्तावस्थेत असलेल्या पराक्रमी वृत्तीची जोपासना करण्यासाठी व हिंदसमाजाला सुसंघटित करण्यासाठी, लोकमान्य टिळकांनी श्रीशिवाजी उत्सव सुरू केला. लवकरच या उत्सवाला देशव्यापी स्वरूप प्राप्त झालें. एकतंत्री ब्रिटिश राज्यकारभारामुळे नवशिक्षित वर्ग चांगलाच असंतष्ट होऊ लागला होता. या असंतोषाची लाट समाजांत खालवर पोचविण्याचे