पान:पाकिस्तानचे संकट.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

र मुसलमानांच्या मागण्यांचा क्रमविकास - (ईश्वरी कृपा म्हणून पंजाबमधील लोक राजनिष्ठ व संतुष्ट राहिले. त्यामुळेच हिंदुस्थानांत आम्ही टिकून राहिलो. पंजाब बिथरला असता तर आमचा पुरा नाशच झाला असता.) अन्य प्रसंगी थपडा सहन करणाऱ्या हिंदी संस्थानिकांना भारताच्या राजकीय प्रगतीचा प्रश्न निघतांच जावईपणाच्या लहरी कां येऊ लागतात आणि स्वराज्य-स्वातंत्र्याचा प्रश्न निघतांच मुसलमानांचा भाव कां वधारतो या प्रश्नांचा, १८५७-५८ साली इंग्रज जें शहाणपण शिकले त्याच्याशी फार जिव्हाळ्याचा संबंध आहे. मुसलमानांच्या महत्त्वाकांक्षांच्या आडमाप उड्या, १९३५ च्या राज्यघटना कायद्यांत संस्थानिकांच्या मागण्यांना देण्यांत आलेले अवास्तव महत्त्व आणि या कायद्याच्या दुरुस्तीची योजना सुचवितांना पंजाबचे पंतप्रधान सर शिकंदर हयातखान यांनी सैन्यांतील पंजाव्यांच्या प्रमाणाबद्दल धरलेला आग्रह" या सर्वांची संगती कशी लावावयाची या-- समाळा बद्दलचे कांहीं एक धोरण चाणाक्ष वाचकांना आतां आंखतां येईल. ____ इंग्रजांच्या अधिराज्याखालीं नांदणाऱ्या हिंदुस्थानांतल्या लोकांना शिक्षण कोणत्या प्रकारचे द्यावयाचे या प्रश्नाचा निकाल १८५७ च्या प्रसंगाआधीच लागला होता. राणीच्या जाहीरनाम्यांतील उदार तत्त्वें घोषित झाली व उच्च शिक्षणाचे कारखाने उभारण्यासाठी व त्यांतून निघणारा माल नंबरी आहे की नाही हे ठरविण्यासाठी विद्यापीठांची स्थापना हळुहळ होऊ लागली. आपण निर्मिलेल्या सृष्टीच्या पसायावर अधिराज्य गाजवावयाचें तर कोणाची तरी मदत पाहिजे म्हणून ईश्वराने माणूस निर्मिला; तो हुबेहूब आपली प्रतिमा म्हणून निर्मिला असें ख्रिस्ताचे भक्त म्हणतात. हिंदुस्थानांतल्या नवशिक्षितांच्या बाबतींतहि हेंच म्हणता येईल ! या नवशिक्षितांची संख्या वाढू लागतांच त्यांच्याकडून कोणता टाहो फोडला जाऊ लागला असेल याची कल्पना १८८५ साली स्थापन झालेल्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या पहिल्यापहिल्या अधि

  • The composition of the Indian Army as on 1st January 1937 shall not be altered. In case of reduction.. the communal proportion shall be maintained ; but this. may be reduced in case of war or other emergency.-- quoted by Dr. Rajendra Prasad in “ Pakistan.”