पान:पाकिस्तानचे संकट.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मा पाकिस्तानचे संकट स्वप्ने शिखांच्या मनांत सदैव घोळत होती. या स्वप्नांना सत्य स्वरूप देण्याला शीख या वेळी प्रवृत्त झाले व म्हणून ते या आंदोलनापासून अलिप्त राहिले. इंग्रजांनी नेपाळवर चाल केली तेव्हां अयोध्येच्या नबाबाने त्यांना बरीच मदत केली होती, ही गोष्ट गुरख्यांच्या मनांत डांचत होती. त्यामुळे, बंडांत सामील होण्याबद्दलची विनंति गुरख्यांना करण्यांत आली असूनहि ती निरुपयोगी ठरली. शीख व गुरखे या प्रसंगी जसे वागले त्याहून भिन्न प्रकाराने ते वागले असते तर, हिंदुस्थानचे राजकीय भवितव्य कदाचित् वेगळ्याच वळणावर गेलें असतें. पण तसें कांहीं न घडतां भाग्यवान इंग्रज या वणव्यांतून निभावून निघाले. "कुंपणी' सरकारचा अंमल संपून राणी सरकारचे राज्य सुरू झाले. नवीं धोरणे आंखतांना अनुभवांनी शिकविलेले शहाणपण जमेला धरण्यांत आले. हिंदु व मुसलमान यांची एकजूट आपल्या सत्तेच्या स्थैर्याला घातक आहे हा धडा इंग्रज या प्राणसंकटामुळे पक्केपणी शिकले. 'नमयामास नपाननुद्धरन्' या वचनांत सुचविल्याप्रमाणे, देशी संस्थानिकांना नष्ट करण्याऐवजी निष्प्रभ करून टिकविण्यांतच धोरणीपणा आहे, असे इंग्रज मुत्सद्यांना वाटू लागले. बंडांत सामील झालेल्या शिपायांचा व सरकारी नोकरांचा कायमचा वृत्तिच्छेद करण्याचे धोरण सुरक्षितपणाचे वाटू लागल्यामुळे, यापुढे सैन्यांत शीख, पंजाबी, सरहद्दीवरचे पठाण व गुरखे यांना प्रामुख्य देण्याची वृत्ति प्रबळ झाली. आजच्या सैन्यांत पंजाव्यांना जे डोईजड महत्त्व आले आहे त्याची पाळमुळ किती खोलवर रुतलेली आहेत हे डॉ. आंबेडकर यांनी आपल्या पुस्तकांत श्री० चौधरी यांच्या Modern Review मधील लेखांच्या आधारें विशद केले आहे.* सर जॉन लॉरेन्सनें १८५८ साली सर फ्रेडरिक करी याला लिहिलेल्या पत्रांतील पुढील उद्गारांवरूनहि तीच गोष्ट सिद्ध होत आहे : “ Under the merey of God, the loyalty and contentment of the people of the Punjab has saved India. Had the Punjab gone, we must have been ruined. ”

  • Thoughts on Pakistan, pp. 67–69.
  1. Quoted by Major Basu in "Rise of the Christian Power in the East," Vol. V., p. 38.