पान:पाकिस्तानचे संकट.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाकिस्तानचे संकट असा शेर एकटा बाजीरावच आहे, असे सर्वांना स्वाभाविकपणेच वाटले.* हिंदुस्थानच्या वायव्य सरहद्दीच्या आसपास शीखांनी आपलें संघटनेचे व सत्तासंपादनाचे कार्य औरंगजेबाच्या वेळेपासूनच सुरू केले होते. मध्यवर्ति मोगली सत्तेवर आघात होत आहेत हे पाहून त्यांनीहि त्या भागांतील मोगली सत्ता त्या सुमारास उधळून हुसकून लाविली. उत्तरेकडील इस्लामी सत्ता नष्ट करण्याचे कार्य मराठे, शीख, रजपूत, जाट, बुंदेले यांचेमार्फत झाले तर पूर्व भारतांतली मोगली सुभेदारांची सत्ता नरम करून तिला वांकविण्याचे कार्य नागपूर-ब-हाडचे मराठेशाही सुभेदार रघुजी भोंसले व जानोजी भोंसलेत्याचप्रमाणे त्यांचे कारभारी भास्करराव कोल्हटकर व शिवभट साठेयांच्याकडून अव्याहतपणे होतच होतें. . मोगलांची मध्यवर्ति सत्ता लुलीलंगडी होऊ लागतांच, आपली स्वतंत्र मुसलमानी सत्ता दक्षिणेत स्थिर करण्याचा प्रयत्न निजामाने केला; पण, या सत्तेला ठोकरण्याचे काम १७३७ सालांतल्या भोपाळच्या लढाईपासून तो थेट १७९४ च्या खर्चाच्या लढाईपर्यंत मराठ्यांनी वारंवार केले. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात दक्षिण भारतांत हैदर, टिपू यांनी जी इस्लामी सत्ता स्थापिली तिलाहि मराठ्यांच्या हिंदुसत्तेचा मोठाच वचक वाटत असे. पानिपतच्या अपयशानंतर मराठ्यांची सत्ता फिरून स्थिरावल्यावर, महादजी शिंदे अर्थात् पाटील बावा हे दिल्लीच्या व उत्तर भारताच्या राजकारणांत पुन: प्रभावीपणाने तळपूं लागले आणि दिल्लीच्या नामधारी बादशाहाचे कुलमुखत्यार म्हणून ते कैक वर्षे सत्ता गाजवीत होते. परक्या मुसलमानांच्या पहिल्या धडकांना तोंड देण्याचे काम एकसारखें कित्येक शतकेंपर्यंत निकराने करावे लागल्यामुळे, अकबराच्या कारकीर्दीनंतर रजपूत हिंदु हे पूर्वीइतके कडवे व प्रभावशाली ठरू शकले नाहीत. पानि

  • स्वतः बाजीरावसाहेबांना या बाबतीत किती आत्मविश्वास वाटत होता हे स्पष्टपणे दर्शविणारे पुढील शब्द स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 'हिंदुत्व' या आपल्या ग्रंथांत (प्रथमावृत्ति) १० ७९-८० वर बाजीरावब्रह्मेन्द्र पत्रव्यवहारावरून उद्धृत केलेले आहेत: "आपली घरगुती भांडणे बाजूला ठेविली पाहिजेत. आतां सर्व हिंदुस्थानास एक शत्रु उत्पन्न झाला आहे. मी तर नर्मदा उतरून सर्व मराठी सैन्य चंबळेपर्यंत पसरून देणार. मग पाहूं या नादिरशहा कसा खाली येतो तो."