पान:पाकिस्तानचे संकट.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

खोटी कल्पना व तिचे खंडण घोरपडे, धनाजी जाधव, खंडो बल्लाळ चिटणीस, रामचंद्रपंत अमात्य हे शिवाजीची धोरणे उत्तम जाणणारे मुत्सद्दी व रणझुंजार होते. १७०७ साली दक्षिणेत मृत्यु पावलेल्या औरंगजेबाची मानसिक तगमग पाहून सर्व मराठ्यांना असें खास वाटले असेल की, मोगलांच्या साम्राज्यसत्तेला शह देण्याचे थोरल्या छत्रपतींनी आरंभिलेलें कार्य पुढे चालवून व संभाजी महाराजांच्या निर्दय वधाचा प्रतिशोध घेऊन आपण महाराष्ट्रीय लोक हिंदु म्हणून कृतकृत्य झालो आहों! अकबर १६०५ मध्ये मेला व औरंगजेब १७०७ मध्ये मेला. या शंभर वर्षांच्या काळांत रजपूत, मराठे, शीख, जाट, बुंदेले अशा हिंदूंच्या प्रतिकारबुद्धीमुळे मोगलांची साम्राज्यसत्ता बरीच संकुचित झाली. ज्या काळांत मोगलांची साम्राज्यसत्ता सगळ्या भारतीय हिंदूंनी अविरोध वृत्तीने मान्य केलेली होती असा काळ भारतीय इतिहासांत असलाच तर त्याची व्याप्ती २०-२५ वर्षांपलीकडे निश्चित नाही. औरंगजेबानंतरच्या काळांत तर दिल्लीच्या तख्तावरची कळसूत्री बाहुलीं हवीं तशी खेळवून हिंदु सत्तांनी भारताच्या राजकारणाला लागलेले मोगली ग्रहण पार नाहींसेंच करून टाकलें! जाना गरजू सय्यद बंधूंच्या मार्फत दिल्लीच्या पादशाही राजकारणांत बोटशिरकाव करण्याचे श्रेय बाळाजी विश्वनाथ पेशव्यांना आहे. मोगली साम्राज्य सत्तेच्या वठलेल्या विषवृक्षाच्या मुळावरच घाव घातला की, त्याच्या इस्लामी फांद्या आपोआप कोसळून पडतील अशा विश्वासाने वागण्याचे वळण मराठयांच्या बुद्धीला लावण्याचे श्रेय प्रतापशाली पहिल्या बाजीरावसाहेब पेशव्यांना आहे. गुजराथ-काठेवाडांत गायकवाडांची हिंदुसत्ता स्थापून, मध्य-भारतांत शिंदे, होळकर, पवार, भोंसले वगैरे पराक्रमी हिंदुघराण्यांची स्थापना करून व शिवाजी महाराजांचा समकालीन छत्रसाल याचा प्रतिपाळ केल्यानंतर, बुंदेलखंड, माळवा या विभागांत पाय रोवून, बाजीरावसाहेबांनी मराठ्यांच्या हिंदुसत्तेचा हिंदुस्थानभर असा वचक बसविला होता की, १७३९ साली नादिरशहाने दिल्लीत लुटालूट केली तेव्हां नादिरशहाला पायबंद घालं शकेल