पान:पाकिस्तानचे संकट.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

.. पाकिस्तानचे संकट इस्लामी छळाला तोंड देण्यासाठी पोलादी संघटना सुरू केली. जोधपूरच्या जसवंतसिंगाला कपटाने मारण्यांत आल्यावर त्याचा मुलगा अजितसिंह याला इस्लामी धर्माची दीक्षा देण्याच्या इराद्याने बादशाहाने त्याला आपल्या दरबारांत नेण्याचा घाट घातला. तेव्हां दुर्गादासासारख्या धूर्त सरदाराने अजितसिंहाला हातोहात पळविले. पुढे तर या दुर्गादासाने खुद्द राजपुत्र अकबर याला हाताशी धरून व दक्षिणेत छत्रपति संभाजी महाराज यांच्याशी संधान बांधून, औरंगजेबाच्या तोंडचे पाणी पळविले. महाराष्ट्रांत स्वराज्य स्थापणाऱ्या शिवाजी राजांनी दक्षिणेत शिल्लक राहिलेल्या शाहयांना शह देऊन आपल्या सूत्रांत गोविलें व कर्नाटकावरून दक्षिणेकडे वळून, त्यांनी जिंजी-तंजावरापर्यंतचा मुलूख अंकित करून घेतला. छत्रसाल, सुजानसिंह इत्यादि मध्यभारतीय हिंदु प्रमुखांशी,राजपूत हिंदूंशी व पंजाबमधील शिखांशी संधाने बांधून, शिवाजी दिल्लीच्या साम्राज्यसत्तेलाच शह देऊ लागल्यामुळे, कपटी औरंगजेबाने महाराष्ट्राच्या या प्रातःस्मरणीय छत्रपतींना तुरुंगांत कसें अडकवून ठेविलें व तेथून बादशाहाच्या हातावर तुरी देऊन ते निसटून दक्षिणेत कसे परत आले, हा इतिहास महाराष्ट्रांत तरी आबालवृद्धांस पूर्ण परिचित आहे. छत्रपति संभाजी महाराजांनी आपल्या कारकीर्दीच्या पहिल्या पांचसहा वर्षांत आपला दरारा कायम ठेविला होता व बापाविरुद्ध उठलेला शहाजादा अकबर हा त्यांचा आश्रयार्थी म्हणून काही दिवस महाराष्ट्रांत मुक्कामहि करून राहिला होता. गाफीलपणामुळे औरंगजेबाच्या हाती पडल्यावर, या थोर छत्रपतीने मृत्यूला ज्या धैर्याने कवटाळिलें तें धैर्यच मोगलांची सत्ता दक्षिणेतून पार हुसकून लावण्याला कारणीभूत झाले. संभाजीला हाल हाल करून मारलें म्हणजे तरी मराठे हाय खाऊन स्वस्थ बसतील अशी आशा दक्षिणेत येऊन राहिलेल्या औरंगजेबाला वाटत होती. पण या आशेला कोणतें फळ आले? लढाईची आघाडी महाराष्ट्रापासून मद्रास इलाख्यापर्यंत पसरून देऊन आणि गनिमी काव्याचे युद्ध शास्त्रशुद्ध पद्धतीने खेळून मराठ्यांनी त्याला सतावून सोडलें! मराठ्यांच्या विलक्षण हालचाली व त्यांचे अकल्पित छापे यांनी भयभीत होऊन बादशाहा त्यांच्या मुलखाला 'पिशाच्चभूमि' हे नांव देऊ लागला ! या काळांत साहस, स्वामिभक्ति, धोरणीपणा इत्यादि गुणांची ज्यांनी शर्थ केली ते संताजी