पान:पाकिस्तानचे संकट.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

खोटी कल्पना व तिचे खंडण परक्यांच्या ५ टक्के खऱ्या-खोट्या भलेपणाला उत्तर म्हणून त्यांच्याशी १०५ टक्के भलेपणाने वागण्यांतला धोका सालस हिंदूंना न कळल्यामुळे, अकबराला हिंदूंचे हार्दिक सहकार्य मिळाले व त्या सहकार्याच्या जोरावर राज्यविस्तार करून आपल्या कारकीर्दीच्या शेवटी शेवटी भरतखंडाचा पुष्कळसा भाग त्याने मोगलांच्या एकछत्री साम्राज्याखाली आणला. पण सोळाव्या शतकाच्या शेवटी शेवटी त्याने जी कामगिरी केली ती टिकली किती अल्प काळ ? राणा प्रतापसिंहाचा मुलगा अमरसिंह याने जहांगीरच्या कारकीर्दीच्या सुरुवातीलाच राजस्थानांत हिंदुसत्ता स्थापण्याचा उद्योग आरंभिला आणि १६०९-१० पासून पुढील ३-४ वर्षांत त्याने जहांगीरच्या सैन्याचा १७ वेळा लढाईत पराभव केला. दक्षिणेत मलिकंबर, शहाजी राजे, मुरार जगदेव प्रभृतींनी आदिलशाही, निजामशाही वगैरे राज्ये मोगली दावणींतून सोडवून ती हिंदुतंत्र करण्याचा प्रबळ प्रयत्न सुरू केला. उत्तरेस . काबूल-कंदाहारपर्यंत पसरलेल्या अकबराच्या राज्याची त्या भागांतहि पीछेहाटच झाली. अकबराच्या मृत्यूला पुरी पन्नास वर्षेहि झाली नाहीत तोंच या भागांतल्या सत्तेला सोडचिठी देण्याचा प्रसंग शहाजहानवर आला. तुटक दिसणाऱ्या या फुटकळ गोष्टी एका सूत्रांत गुंफल्या म्हणजे कोणीहि असाच निष्कर्ष काढील की, आपलें मुसलमानपण विसरून व मोठी खोल धोरणे आंखून अकवराने मोगली साम्राज्याचा शामियाना उभारला खरा; पण, १६०५ मध्ये अकबर मरण पावल्यानंतर अल्पावधीतच, हिंदूंनी हिकमतीपणाने व हिंमतीने वागून या शामियान्याचे तणावे तोडन टाकण्याला चौफेर प्रारंभ केला. आणि उग्रप्रकृति औरंगजेबाने आपल्या कडव्या इस्लामी कारकीर्दीला सुरुवात केल्यानंतर, हिंदूंच्या स्वत्व-स्थापनेच्या या उद्योगांना उधान भरतीच आली! आग्रा-मथुरा भागांतील हिंदूंच्या प्रतिकार-बुद्धीमुळे औरंगजेबाला चार पांच वर्षे अस्वस्थ बनविले व गोकुळ जाट याने केलेल्या त्या वेळच्या बंडांत औरंगजेबाचे सहस्रावधि सैनिक मृत्युमुखी पडले. पतियाळा संस्थानांत सतनामी लोकांनी इस्लामी सत्तेविरुद्ध बंड केलें तें मोडतां मोडतां औरंगजेब जेरीस आला. गुरू तेग बहाद्दरच्या अमानुष वधामुळे खवळलेल्या शिखांनी २पाकि०