पान:पाकिस्तानचे संकट.pdf/249

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३८ पाकिस्तानचे संकट तरुणांनी सुचेल त्या पद्धतीने व जमेल त्या ठिकाणी हिंदुसंघटनेच्या कार्याला प्रारंभ केला पाहिजे! हिंदुसमाजाचा थर नि थर जागृत व डोळस करणारे संघटनात्मक कार्य, हिंदु म्हणून राजकारण करण्याची उमेद व आधुनिक शास्त्रसंपन्नता व शस्त्रसंपन्नता यांच्याविषयींची आस्था इतक्या गुणांनी प्रबळ बनलेला हिदुसमाज, उद्यांच्या जगाची घडी कशीहि । बसली तरी,आपल्या स्वतंत्र तेजाने तळपल्याशिवाय राहणार नाही. चालू लढाईनंतर इंग्रजी सत्ता हिंदुस्थानांत यथापूर्व राहिली तर इंग्रजांना यापूर्वीची हिंदुविषयक धोरणे तशीच पुढे चालवितां येणार नाहीत ! मुसलमानांना चढवून ठेव याचे धोरण भारतीय राजकारणापुरतें इंग्रजांनी आजवर खेळविलें हें खरें; पण, याचा अर्थ असा नव्हे की, इंग्रज व युरोपियन मुत्सद्दी मुसलमानांचे सत्यस्वरूप ओळखीत नाहीत! बर्कपासूनच्या अनेक ब्रिटिश मुत्सद्यांनी तुर्की मुसलमानांबद्दलचा तिरस्कार असंदिग्ध शब्दांत व्यक्त करून ठेविलेला आहे. “तुर्की लोक रानटी आहेत आणि कोणाहि सुसंस्कृत ख्रिस्ती राष्ट्राने त्यांच्याशी मित्रभाव ठेवू नये" असा इषारा बर्कनें देऊन ठेविला होता. यच्चयावत् सर्व तुकांनी बाडबिछायत घेऊन युरोपमधून निघून जावें, असा सल्ला देण्याला ग्लॅडस्टननें कमी केले नव्हतें ! तुर्की मुसलमानांच्या विध्वंसक प्रवृत्तीचा निषेध ब्राइससारख्या ब्रिटिश मुत्सद्याने जितक्या कडक भाषेत केला आहे तितक्याच कठोर शब्दांत ट्रीटस्के या जर्मन विचारवीरानेहि तुर्काच्या या प्रवृत्तीवर कोरडे ओढले आहेत! ". भारतीय सैन्यांतले मुसलमान मुसलमानांविरुद्ध लढाईला पाठ-म विण्यांत येऊ नयेत हा चालू युद्धाच्या आरंभी जीनांनों धरिलेला आग्रह ब्रिटिश मुत्सद्यांच्या डोळ्यांत चरचरीत अंजन घालणारा आहे. इस्ल मी जा संघटित करण्याची मुसलमानांची मनीषा व जीनच्या तोंडून निघालेली भारतीय मुसलमानांच्या मनातली ही मळमळ यांचा दूरदर्शीपणाने चिार करून व ब्रिटिश मुत्सद्यांना यापुढे आ लां धोरणे आंबावों लागतील! चाल युद्धानंतरच्या काळांत ब्रिटिश मुत्सद्दी आत्मघातकी