पान:पाकिस्तानचे संकट.pdf/248

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३७ हिंदुसंघटनेचा महामंत्र ठरवावें लागेल हे खरे; पण, अशा मिशनरी कार्यावांचून समाजसंघटना व राष्ट्रसंघटना निर्माण होणार नाही, हेहि तितकेच खरे आहे ! श्री शिवछत्रपतींच्या काळी समर्थांची संघटना जिवंत होती; बाजीरावसाहेबांच्या काळी ही संघटना नामशेष होऊन, सावसावकारीच्या उपद्व्यापांत लडबडलेला ब्रीद्रस्वामी प्रतिष्ठितपणाने नांदत होता. या तफावतीचे मराठी साम्राज्याच्या स्थैर्याच्या दृष्टीने कांहीं परिणाम झाले की काय हेहि तपासून पाहिले पाहिजे. हिंदुसंघटनेचे राजकारणी कार्य व हिंदुसंघटनेचें मिशनरी कार्यहिंदुसंघटनेचे छत्रपति व हिंदुसंघटनेचे समर्थ-यांचे परस्परसंबंध कोणत्या स्वरूपाचे असावे याचाहि विचार दूरदर्शीपणाने झाला पाहिजे. . हे सर्व विचार करून, वेळ वाया न दवडितां कार्याला लागले पाहिजे; कारण, मराठी मुलूख, बंगाल वगैरे काही भाग वगळले तर इतर भागांत अद्याप हिंदुसंघटनेच्या कार्याचा ओनामाच गिरविला जात आहे. महाराष्ट्रीय हिंदु तरुणांनी तर हे कार्य म्हणजे आपली मिरासदारीच आहे, असें समजले पाहिजे.. maa सह्याद्रीच्या शिखरांवर वसलेल्या किल्ल्यांतून समोरच्या समुद्राची टेहेळणी करीत रहावें, शस्त्रधारी उजवा हात उत्तरेपर्यंत का पोचवून अटकेपर्यंतच्या इस्लामी संकटाचा प्रतिकार करावा व . उरलेल्या हाताने दक्षिण भारतातल्या हिंदूंना अभय द्यावें-हेगा। महाराष्ट्रीय हिदु तरुणांचे कुलवत आहे. या खानदेशच्या काही भागांतले कित्येक लोक उजव्या हाताला 'जेवण्याहात' म्हणं लागले आहेत! इतकें या कुलवताचे विस्मरण आपल्याला होऊ लागले आहे! महाराष्ट्रालाच आपल्या पूर्वपरंपरेचे विस्मरण झाले की सगळा ग्रंथ आटोपलाच! I महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेलें मराठ्याविना राष्ट्र-गाडा न चाले । हा सेनापति बापटांनी दिलेला इषारा चित्तांत वागवून, महाराष्ट्रीय हिंदु