पान:पाकिस्तानचे संकट.pdf/244

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३३ हिंदुसंघटनेचा महामंत्र अगर भासला तरी, त्यांत गंभीर स्वरूपाची काही तरी वैगुण्ये आहेत हे अनेकांना दिसू लागले होते. गांधीवादाची अपूर्णता ज्यांनी पहिल्या दिवसापासूनच ओळखली असे कै० दादासाहेब खापर्डे, कै० बिपिनचंद्र पाल, के० डॉ० अॅनी बेझंट, कै० सर सी० वाय चिंतामणी हे देशभक्त दिवंगत झाले. तपस्वी बाबासाहेब परांजपे, भालाकार भाऊसाहेब भोपटकर यांच्यासारखे कित्येक देशभक्त अद्याप सुदैवाने आपल्यामध्ये आहेत. गांधीवादावर आसक्त होऊन काँग्रेसच्या अध्यक्षपदापर्यंत पोचलेले व शेवटी गांधीवादाचे टीकाकार बनलेले कै. श्रीनिवास अय्यंगार आणि I Follow the Mahatma हे पुस्तक प्रसिद्ध केल्यानंतर वर्षसहा महिन्यांच्या आंतच गांधीवादाला रामराम ठोकून मोकळे झालेले श्री० मुनशी यांची नांवेंहि, या बाबतीतली ठळक नांवें म्हणून, एकाद्याला सहज आठवण्यासारखी आहेत. अणे-केळकर, मुंजे-खरे, दासबाबू-सुभाषबाबू, विठ्ठलभाई-जम्नादासजी लालाजी-भाईपरमानंद अशा थोर थोर देशभक्तांची मालिका चित्तचक्षूपुढे आली आणि गांधीवादाची जवळून परीक्षा केल्यावर या देशभक्तांनी गांधीवादाचा मार्ग शेवटी सोडून दिला हे सत्य लक्षात ठेविलें म्हणजे, गांधीवादांत निसर्गतःच कांहीं तरी न्यून आहे, हे आपोआप पटतें ! 'पुणे-ठराव' पास होण्याच्या वेळी गांधीजींचे व्याही श्री. राजगोपाळाचारियर, मौ० अबुल कलाम अझाद, सरदार पटेल वगैरेंनी गांधीवादाची खरड कमी काढली, असें नाहीं ! आणि, आतां यापुढील काँग्रेसच्या राजकारणांत ही त्रयी पुणे येथील वृत्तीची व कृतीची पुनरावृत्ति काढणार नाही, असें तरी कशावरून? बॅ० सावरकरांचे वैशिष्ट्य हे की गांधीवादांतलें वैगुण्य त्यांनी दुरूनच बुद्धीने ओळखले आणि गांधीवादाच्या दिशेला एक पाऊलहि टाकण्याला त्यांनी स्पष्ट नकार दिला ! गांधीवादी काँग्रेसच्या भोंवतीं घुटमळत राहण्याचे व ती काँग्रेस सुधारेल या आशेंत शक्तिक्षय व कालक्षय करण्याचे त्यांनी साफ नाकारलें व 'एष पन्था,एतत्कर्म' असें म्हणून त्यांनी आपला उद्योग धडाडीने सुरू केला. सावरकरांच्या विचारौघाच्या लाटा देशाच्या कोनाकोपऱ्यापर्यंत जाऊन पोंचू लागल्या आणि आजवर नेमकें चुकत काय होतें तें लोकांना कळू लागलें. यंत्राची गुलामगिरी वाईट असली तरी यंत्रद्वेष करून निभाव