पान:पाकिस्तानचे संकट.pdf/245

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३४ . पाकिस्तानचे संकट लागण्याचे युग शिल्लक राहिलेले नाहीं; स्वावलंबन हे राष्ट्रविमोचनाचे एक साधन असले तरी, परदेशी प्रचाराला परावलंबन मानण्याचे कारण नाहीं;' असहकारयोगानें संन्यासधर्माची छाटी गुंडाळली तरी शेवटी असहकारयोगांतला संन्यास हा त्रिदंडी संन्यासच आहे; अहिंसावाद कितीहि मोहक दिसला तरी त्याचें आत्यंतिक व एकांतिक स्वरूप समाजधारणेशी व राजधर्माशी विसंगतच आहे; राष्ट्ररक्षणाचा उपाय म्हणून सैनिकसिद्धता अवश्य , असल्यामुळे, ही सिद्धता साधेल त्या उपायांनी साध्य करून घेतली पाहिजे; हिंदुस्थान देश म्हणजे अहिंदूंची उतारपेठ वि.वा धर्मशाळा नसून, स्वतःचें एकमेव निवासस्थान म्हणून हिंदंनी हिंदुस्थानकडे पाहिले पाहिजे व या निवासस्थानाच्या सुरक्षिततेसाठी हिंदूंनी झटले व झगडले पाहिजे, इत्यादि विचार सावरकरांच्या अद्वितीय वाणीतून प्रकट होऊ लागतांच, 'हरपलें श्रेय सांपडल्याची प्रतीति हिंदु मनाला पटू लागली! अहमदाबादच्य हिंदुमहासभेचे अध्यक्षस्थान सावरकरांनी मंडित केले तेव्हां परमानंद-मुंजे या जोडीला असे वाटले की, आपण जतन करून ठेवलेला ठेवा सांभाळण्याला समर्थ असा सिद्धपुरुष आज आपल्याला भेटला ! आणि, तेव्हांपासून आजपर्यंत सावरकरांचे कार्य अविरतपणाने चाललेलेच आहे. महाराष्ट्रांतला शिक्षित वर्ग गांधीवादाच्या पूर्णपणें आहारी कधीच गेला नसल्यामुळे, सावरकरांचे हिंदुसंघटणेचे तत्त्वज्ञान महाराष्ट्रांत प्रथम फोफावू लागले, हे स्वाभाविक आहे. टिळकांच्या वेळेपासून महाराष्ट्रीय राजकारणाशी समरस होण्यांत मोठेपणा मानणारा बंगालप्रांतहि आज प्रायः हिंदुसंघटनवादी बनला आहे. नागपूरपासून रत्नागिरीपर्यंतचा व बडोद्यापासून बेळगांव पर्यंतचा मराठी मुलख आणि बंगाल एवढा भाग आतां प्रायः हिंदुसंघटनवादी बनला आहे. सावरकरांच्या ओजस्वी संदेशाचें लोण हिंदु संस्थानांपर्यंत जाऊन पोंचलें आहे व त्यामुळे ग्वालेर, इंदूर, बडोदें, कोल्हापूर, वगैरे मराठेशाही संस्थाने आणि त्रावणकोरसारखी काही इतर संस्थाने हीहि जगाकडे एका नव्या दृष्टीने पाहूं लागली आहेत. हिंदुवंश व हिंदुजाति यांना उज्ज्वल भूतकाल आहे व या उज्ज्वल भूतकालाचें