पान:पाकिस्तानचे संकट.pdf/243

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३२ पाकिस्तानचे संकट उपदेश, ब्रिटनच्या शत्रूशी लढता लढतां स्वराज्यसंपादन करून आपण खरा करून दाखविला असता! "बलाढ्य राष्ट्रांमध्ये जी चढाओढ चाललेली आहे ती ज्या वेळी निकरास येईल तेव्हां, अशा रीतीने मृतप्राय केलेल्या हिंदुस्थानचे इंग्लंडच्या गळ्यांतील ओझें इंग्लंडास असहय नाहीं तरी अडचणीचे झाल्याखेरीज राहणार नाहीं” हे भविष्य लोक मान्य टिळकांना १९०२ सालींच दिसले होतें अदूरदर्शी ब्रिटिश मुत्सद्यांना टिळकांचे द्रष्टेपण लाभले नव्हते म्हणून म्हणा, त्यांच्या दृष्टीवर साम्राज्याच्या वैभवाची धंदी आली होती म्हणून म्हणा अगर हे मुत्सद्दी मुसलमानांच्या राजनिष्ठेवर फाजील विश्वास ठेवून राहिल्यामुळे म्हणा, त्यांचे हिंदु लोकांविषयींचे धोरण चुकत गेलें, यांत संशय नाही. गेल्या महायुद्धाच्या अखेरीपासून चालू महायुद्धाच्या प्रारंभापर्यंत जो वीस वर्षांचा काळ लोटला त्या काळांत ब्रिटिश मुत्सद्यांना असा इषारा देणारा, लोकमान्यांच्या इतका लोकप्रिय, पुढारी हिंदु समाजांत नव्हता! अहिंसावादाचे निष्ठावंत उपासक गांधीजी या दिशेने विचार करतील हे शक्यच नव्हतें ! पं० जवाहरलालजी नेहरू हे गांधीजींच्या लोकविलक्षण विचारसरणीच्या भोवऱ्यांत भ्रमं लागले नसते आणि आंतरराष्ट्रीयवादाचा त्यांच्या मनावरील पगडा पुष्कळसा कमी असता तर, त्यांच्या हातून बहुधा या बाबतींत योग्य धोरण आंखले गेलें असतें ! - पण, स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीहून निबंधमुक्त होईपर्यंत या गोष्टी घडल्या नाहीत, हे खरें ! गांधीवादांत अंतर्भूत झालेले अहिंसावाद व विश्वप्रेमवाद १९२० साली हिंदी राजकारणांत घुसले ! १९२० सालापासून १९४१ सालापर्यंत जे जे हिंदु देशभक्त गांधीवादाजवळ जाऊन तेथून परत फिरले त्या सर्वांच्या मनोवृत्तीचे पृथक्करण विस्ताराने करणे या ठिकाणी शक्य नाही. हिंदुसमाजाच्या उशापायथ्याशी नांदणारा मुसलमान समाज अहिंसावादाचे वैय्यर्थ्य आपल्या वर्तनाने हिंदूंना रोज पटवून देत होता आणि १९२९-३० सालापासून युरोपियन राष्ट्रे व जपान यांनी जो उपक्रम आस्ते आस्ते सुरू केला त्यामुळे अहिंसावाद व विश्वप्रेमवाद या दोहोंमधील दोष लोकांच्या निदर्शनास येत होते. गांधीवाद कितीहि गोजिरवाणा असला