पान:पाकिस्तानचे संकट.pdf/242

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हिंदुसंघटनेचा महामंत्र २३१ दैन्यामुळे व दारिद्र्यामुळे हिंदुसमाजाला रकटीं पांघरावी लागतात. त्यामुळे त्याचे बारीक सारीकहि दोष मिस् मेयोसारख्या गटार इन्स्पेक्ट्रेस' कडून भडक रंगांत जगाच्या चावडीवर मांडले जातात. हिंदुसमाजाच्या अंगावर आज जी रकटी आहेत ती नामदेव महाराजांसारख्या शिंप्यांकडून व्यवस्थितपणे शिवली गेली तर हिंदुसमाजांतील दोषांचे हे ओंगळ प्रदर्शन टळणार नाही का? मोठी संघटना म्हटली म्हणजे त्या संघटनेत कच्चीपक्की मडकी एकमेळाने नांदावयाचीच! कच्च्या मडक्यांचा आवाज नेमका लोकांच्या कानावर घालून त्यांना त्यांचे योग्य स्थान दाखविण्यासाठी गोरोबा कुंभारांचीहि हिंदुसंघटन कार्याला जरुरी आहे. हिंदुसंघटनावादी कार्यकर्त्यांनी आपली मनें कितीहि निर्मळ बनविली तरी, कित्येकांच्या डोक्यांतला कुकल्पनांचा मळ एकदमच निघून जाईल असें नाही. हा मळ काढून टाकण्यासाठी सेनोबा. सारख्या कारागिरांची आवश्यकता हिंदुसंघटनाकार्यांत आहेच आहे. हिंदुसंघटनेचे अवाढव्य कार्य करतांना ज्यांना आपल्या शरीरावरच्या कातड्याचे जोडे फाडावे लागतील त्यांचे क्लेश कांही अंशी तरी कमी व्हावे म्हणून, त्यांना पादत्राणे पुरविण्यासाठी आणि हिंदुसंघटनेच्या कार्यावर कुत्सितपणाने आक्षेप घेणारांना मोजून पैजारा मारण्यासाठी-रोहिदास बाबांचीहि गरज आहेच आहे. हे सर्व थर हिंदुसंघटनाकार्यांत अवश्य सामील होतील आणि एकसंध झालेला प्रचंड हिंदु समाज कोटिकोटि कंठांतून धन्योद्गार काढू लागेल, असें मनोहर दृश्य एखाद्या हिंदूंने आजच कल्पनेने पाहिले तर तें खास चुकीचे ठरणार नाही! कारण, हिंदुसंघटनेच्या कार्याच्या उज्ज्वल भवितव्याबद्दल विश्वास बाळगण्याला अत्यंत अनुकूल असा कोणता काल असेल तर तो सध्यांचाच काल आहे. चालू युद्धानंतर जगाचे रंगरूप कसें व किती पालटते हे ठरविण्याचे मोटसें सामर्थ्य सध्या आपल्या ठिकाणी नाही. आपल्या राज्यकर्त्यांनी आपल्या ठिकाणी हे सामर्थ्य निर्माण करून ठेविलें असतें तर, ब्रिटिश साम्नाज्यावर ओढवलेल्या सध्यांच्या प्रसंगांत आपण केवढी तरी कामगिरी करून दाखविली असती व 'मारितां मारितां घ्यावें,राज्य आपुलें' हा श्रीसमर्थांचा