पान:पाकिस्तानचे संकट.pdf/235

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२४ पाकिस्तानचे संकट जमिनीच्या मालकाचा मालकी हक्क म्हणून योग्य हिस्सा त्याला मिळणे हैं जितकें श्रेयस्कर आहे तितकेंच, श्रम करणाऱ्या कृषीवलाला त्याच्या श्रमाच्या मानानें कांहीं तरी उरणें हेंहि आवश्यक आहे. भूमाता ही गोमातेसारखी आहे. गोमाता दूध देते ती मुख्यतः वात्सल्यामुळे देते. जमीन सस्यशाली होते तीहि वात्सल्यामुळेच होते. ज्या वत्सामुळे हे वात्सल्य संभवतें त्या वत्सालाच उपाशी मारून चालणार नाही! गाईची धार काढतांना एक सड जसा वासरासाठी म्हणून सोडून देण्यांत येतो तसाच जमिनीच्या उत्पन्नांतला कांहीं एक किमान हिस्सा जमिनीच्या वत्सासाठी म्हणजेच कष्टाळू शेतकऱ्यासाठी प्रथम वेगळा काढून ठेवला पाहिजे. हिंदु मनोभूमीतून निष्पन्न होणारे व हिंदु मनोभूमिकेला पूर्णांशाने . पटणारे हे तत्त्वज्ञान हिंदुध्वजावर कोरून हिंदुसंघटनवादी लोक या खेड्यापाड्यांतून फिरूं लागतील तर 'भाकरीवाद' आणि 'भाईवाद ' यांची भंबेरी उडाल्याशिवाय राहणार नाही. हिंदुसंघटनेच्या कार्याला या भूमिकेवरून सुरुवात करण्याखेरीज गत्यंतर तर नाहीच; पण, ही भूमिका निर्माण करणे वाटते तितकें सोपं नाही. आणि म्हणूनच, हिंदुसंघटनेचे कार्य हाती घेऊ पहाणाऱ्या माणसांची निरखूनपारखून निवड झाली पाहिजे. मनाचा मोठेपणा व हिंदुसंघटनेच्या कार्यावर: धार्मिक स्वरूपाची श्रद्धा हे दोन गुण अंगी असतील तरच मनुष्याच्या हातून हिंदुसंघटनेचे कार्य योग्य वृत्तीने व योग्य प्रकाराने होऊ शकेल. माझ्या हाती आहे तें-अगर हाती लागले आहे तें--सर्वच्या सर्व जसेच्या तसे टिकलेंहि पाहिजे आणि हिंदुसमाज संघटितहि झाला पाहिजे या दोन अपेक्षा नुसत्या : परस्परविसंगतच नसून त्या परस्परविरोधीहि आहेत. You : cannot eat a cake and also have it, हाच न्याय या बाबतीत खरा ठरणारा आहे. मला प्राप्त झालेली भलीबुरी प्रतिष्ठा, मला लाभलेलें वेडेवांकडे स्वास्थ्य, माझ्या तिजोरीत सांठलेली 'संपदा, माझ्या अंगांत खेळणारे बळ या सर्व वस्तूंना रेसभर विकृति होता कामा नये आणि हिंदुसंघटन मात्र झाले पाहिजे अशी अपेक्षा करणारांना हिंदुसंघटन हा शब्द तेवढा