पान:पाकिस्तानचे संकट.pdf/234

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हिंदुसंघटनेचा महामंत्र २२३ः ज्यांच्या ठिकाणी दातृत्वबुद्धि आहे व ज्यांना परिस्थितीची अनुकूलता आहे असे हिंदूहि शहरांतून व खेड्यांतून हजारों नसले तरी शेंकडों आहेत.. या दोघांची हिंदुत्वाच्या भूमिकेवर सांधेजोड घडवून आणणे हे हिंदुसंघटनवादी कार्यकर्त्यांचे काम आहे. या सर्व प्रकाराचे सूत्रमय वर्णन असे करता येईल की, हिंदुसंघटनवाद्याने दररोज लक्ष्मी-नारायणाचे दर्शन घेतले पाहिजे. एका दरिद्रीनारायणाच्या घरांत जाऊन त्याच्याशी समरस होणे आणि त्याच्या दैन्याचा थोडाफार परिहार करूं शकेल अशा ... लक्ष्मीवंताशी त्याचा संयोग घडवून आणणे हे हिंदुसंघटन वाद्याच्या नित्य क्रमांतलें एक कार्य होऊन बसले पाहिजे. हिंदुसंघटनवादी या वृत्तीने पाहू लागतील व वागं लागतील तरच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुचविलेल्या वर्गसमन्वयाच्या पायावर हिंदु समाजाची उभारणी करता येईल. वर्गविग्रह निर्माण करणारे लोक हे स्वतःच्या कर्तबगारीने हिंदुसमाजाला प्रिय होत आहेत, अशांतला भाग नाही. दैन्यामळे टेकीस आलेल्या गरीबगुरीब हिंदूंना या वैदंचेच तेवढे दर्शन होतें; चांगल्या वैद्यांचे त्यांना दर्शनच घडत नाही; आणि 1. म्हणून या वैदूंना उभे राहाण्याला आधार तरी सांपडतो! वर्गसमन्वयाचे तत्त्व न्यायाच्या भूमिकेवरून अमलात आणण्याचा निश्चय केलेले हिंदुसंघटनावादी कार्यकर्ते समाजांत चौफेर फिरूं लागतील तर मालक व मजूर, जमीनदार व शेतकरी अशा प्रकारच्या सर्व वर्गांच्या गैरसमजुती: तेच निवारण करू शकतील. मालक, 'मालक' असला म्हणून त्याने आपण : मनष्य आहों हे विसरून चालणार नाही आणि तो जर माणुसकीला जागेल, तर हिंदु मजूरहि सहसा वर्दळीवर येणार नाहीत. वर्दळीवर येऊं नये ही जी, हिंदंची उपजत प्रवृत्ति ती हिंदुमजुरांतहि असतेच असते. प्रसंग निकरावरच., आला म्हणजे हिंदु मजूर या प्रवृत्तीला पारखा बनतो. .: मालकांना , माणुसकीच्या बंधनांत ठेवणे आणि वर्दळीवर...' ... येण्याच्या प्रसंगांपासून मजुरांची मुक्तता करणे ही कामें हिंद- संघटनवाद्यांना हाती घ्यावी लागतील....... .....