पान:पाकिस्तानचे संकट.pdf/236

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हिंदुसंघटनेचा महामंत्र २२५ कळला; त्या शब्दाचा अर्थ त्यांना अद्याप कळावयाचा आहे, असे म्हणावें लागेल. हिंदुसमाज में एक स्वतंत्र विश्व आहे आणि विश्वात्मक देवाचा संतोष व्हावा म्हणून श्रीज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःचे मन जसे मोठे व मऊ बनविले होते तसेंच प्रत्येक हिंदुसंघटनवाद्याचें मन मोठे व मऊ बनले पाहिजे. राज्यवैभव भोगू लागलेल्या आपल्या पराक्रमी पुत्रांची विनंति अव्हेरून कुंतीमाता धृतराष्ट्रासह तपश्चर्येला निघाली; तेव्हां तिनें पांडवांना जो बहुमोल उपदेश केला तो व्यासमहिर्षीनी श्लोका(तच सांगितला आहे; पण तो उपदेश सगळ्या महाभारताच्या तात्पर्यासारखा आहे, असें भारताचार्य कै. नानासाहेब वैद्य यांनी म्हटले आहे. "धर्मे वो धीयतां बुद्धिः मनो वो महदस्तु च" (तुमची बुद्धि धर्माच्या ठिकाणी स्थिर होवो आणि तुमची मनें विशाल होवोत) हाच उपदेश आपल्यालाहि लागू आहे, असे प्रत्येक हिंदुसंघटनवाद्याने मानले पाहिजे. असे हिंदुसंघटनवादी अद्यापि भरपूर निर्माण झालेले नसल्यामुळे, हिंदु समाजांतील असंख्य लोकांना हिंदुसंघटन म्हणजे काहीतरी पोकळ बडबड आहे असे वाटते. हिंदुसमाजांतील कोट्यवधि माणसें अज्ञान, दैन्य, निराशा, जुलूम यांच्याशी दररोज झगडत असतांना, हिंदुसंघटनवादी त्यांच्या सन्निध येऊन मायेचा शब्दहि अद्याप बोलू शकत नसल्यामुळेच, त्यांच्या तोंडून हिंदु. संघटनाबद्दल परकेपणा सुचविणारे शब्द बाहेर पडतात. " जनांच्या कोरड्या गप्पा, असे सारे जगदबंध हमामा गर्जनेचा हो, न नेत्री एकही बिन्दु" या काव्यपंक्तींत कै० कविश्रेष्ठ तांबे यांनी ज्या सहानुभूतिशून्य वृत्तीचें वर्णन केले आहे तीच वृत्ति समाज आपल्या विषयींहि धारण करतो असेंच हताश बनलेल्या हजारों हिंदूंना आज तरी वाटत आहे ! अशा हजारों हिंदंची सारी दुःखें नष्ट करण्याला जी विविध प्रकारची ऐपत हिंदुसंघटनवादी व्यक्तींना व संस्थांना असणे अवश्य आहे ती ऐपत त्यांना अजून यावयाची आहे, हे खरें आहे. पण, १५पाकि०