पान:पाकिस्तानचे संकट.pdf/231

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. २२० पाकिस्तानचे संकट - पाहिजे. काल हिंदुसमाजांत किती बालके जन्माला आली हे जर हिंदुसंघटना वाद्यांना आज कळण्यासारखे आहे, तर या सहज मिळणाऱ्या माहितीचा '. त्यांनी हिंदुसंघटनेच्या दृष्टीने उपयोग कां करूं नये? काल जन्मलेल्या बाल: कांच्या घरांचे पत्ते नगरपालिकेंतून मिळवून, त्या घरांचा तपास काढीत, हिंदुसंघटनावादी लोक फिरू लागतील तर त्यांना हिंदुसमाजाशी जिव्हाळ्याचा संबंध जोडता येणार नाही काय? काल जन्मलेली जी हिंदु बालकें सुस्थितीत असतील त्यांची व त्यांच्या मातांची हिंदु म्हणून हिंदूंकडून नुसती पूसतपास होऊ लागली तरीहि, त्यांच्या कुटुंबांतील इतर माणसांच्या अंगावर मूठभर मांस चढल्यासारखे होईल. हिंदुसंघटनावादी माणसें अशा कार्यासाठी हिडू लागली तर त्यांना सर्वत्र सुस्थितीहि दिसणार नाही. काल जन्मलेलें मल आणि त्याला जन्म देणारी त्याची माता या दोघांनाहि अंगभर वस्त्र मिळालेले नाही आणि घांसभर अन्न मिळालेले नाही अशी हृदयविदारक दृश्ये त्यांच्या दृष्टीस कितीतरी पडतील! हिंदुसंघटनावादी लोक आणि हिंदुसंघटनावादी संस्था अशा अर्भकांना आणि त्यांच्या मातांना अल्पस्वल्प मदत कर्तव्य म्हणून करतील तर, हिंदु समाजाचा कायापालट हां हां म्हणतां होऊं लागेल, यांत संशय नाही. मृत्यूच्या नोंदींचाहि उपयोग अशाच दृष्टीने करता येण्यासारखा आह. मृत्यु हा प्रसंगच असा असतो की, त्या प्रसंगानंतर मृताच्या आप्तेष्टाना । मायेचा एक शब्दहि लाख मोलाचा वाटत असतो. अशा प्रसंगांत सांपडलेल्या हिंदूंची हिंदु म्हणून विचारपूस होऊ लागली तर, समाजांतला अडाण्यातला अडाणी व गरिबांतला गरीब हिंदुहि 'मी हिंदू आहे' असें अभिमानाने म्हण लागेल. आज स्थिति अशी आहे की, 'तीस कोटी हिंदु' ही भाषा कांहीं। :थोडे लोक अभिमानाने उच्चारतात; पण इतर कोट्यवधि हिंदूंना त्या भाषेतील रहस्यच समजत नाही. ....' ही स्थिति पालटणार नाही तोपर्यंत तीस कोटि हिंदु आणि तीस कोटी हिंदूंचे राष्ट्र हे शब्दप्रयोग पोकळ व निरर्थक ठरतील. नेणत्या हिंदूंच्या