पान:पाकिस्तानचे संकट.pdf/232

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२१ हिंदुसंघटनेचा महामंत्र भावनांनजीक भूतदयेच्या मार्गाने येऊन पोचल्यावर हिंदुसंघटनवाद्याने त्यांचा स्वाभिमान जागृत कसा करावयाचा या विषयाकडे वळले पाहिजे. श्रेष्ठकनिष्ठपणाच्या, शिवाशिवीच्या, सोंवळेओवळे- या पणाच्या परंपरागत कल्पना हिंदु समाजांत ठाण मांडून बसलेल्या असल्यामुळे, आज हजारों हिंदूंचा स्वाभिमान रोज पायातळी तुड विला जात आहे. मिष्टान्नांच्या पंक्तीवर पंक्ति लग्नकार्यांतून उठत असतात आणि माजोरीपणाने पानांत टाकून देण्यात आलेले उष्टं अन्न दीनवाण्या हिंदूंच्या पोटांतली आग शमावी म्हणून त्यांच्या पदरांत टाकले जात असतें! तीस कोटि हिंदूंचे स्वाभिमानी राष्ट्र निर्माण व्हावयाचे असेल तर हे घातकी प्रघात . ताबडतोब थांबले पाहिजेत. . असे प्रकार घडत असतील त्या घरी हिंदुसंघटनवाद्यांनी या ... अन्नग्रहणहि केले नाही, तर तें शोभण्यासारखे आहे. सार्वजनिक देवालयांचे उत्सव होतात आणि त्या उत्सवांची व्यवस्था नीटपणी व्हावी म्हणून ब्राह्मणांपासून अंत्यजापर्यंतचे सर्व हिंदु खपत असतात. पण .. या उत्सवांचा प्रसाद ग्रहण करण्याची वेळ आली म्हणजे मात्र हे आधी, ते मग' असे प्रकार सुरू होतात. अशा प्रकारांमुळे, स्वाभिमानी वृत्तीचा कसा चेंदामेंदा होतो हे इतरांना कळलें नाहीं तरी, हिंदुसंघटनवाद्यांना तें कळले पाहिजे; आणि, असे प्रकार थांबविण्याचा अट्टाहास त्यांनी धरला पाहिजे, सार्वजनिक म्हणून जे उत्सव हिंदुसमाजातर्फे साजरे केले जातात तेहि या दष्टीने अधिक संघटित झाले पाहिजेत. ठराविक वस्तीत राहाणाऱ्या आणि वीट येईपर्यंत गाणे-बजावणे लुटणाऱ्या हिंदूंच्या मेळाव्यांतूनच मेळयांच्या व गाण्यांच्या कार्यक्रमांची लयलूट व्हावी, यांत स्वारस्य कोणते आहे ? ज्यांना हिंदुत्वाची नीटशी ओळखहि झालेली नाही, काबाडकष्ट करीत, कण्हतकुंथत जगावें लागत असल्यामुळे ज्यांना करमणूक म्हणजे काय असते हे कळतहि नाही, अशा हिंदूवस्तीच्या भागांत या सार्वजनिक उत्सवांचे फड रंगू लागले तर हिंदुत्वाची जागृति व करमणुकीच्या साधनांची