पान:पाकिस्तानचे संकट.pdf/230

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हिंदुसंघटनेचा महामंत्र .२१९ -मातापितरांच्या पोटी झाला हे पाहात बसण्याला हिंदूंना सवडच नाही. दादाभाई नौरोजी पारशी मातापितरांच्या पोटी जन्मले असतील! ते या नव्या वर्णव्यवस्थेतील श्रेष्ठ ब्राह्मणच आहेत; आणि, महर्षि विठ्ठल रामजी -शिंदे. अगर डॉ० आंबेडकर हेहि या नवीन वर्णव्यवस्थेतील श्रेष्ठ ब्राह्मणच असल्यामुळे, प्रत्येक हिंदुसंघटकाने त्यांच्यापुढे आपला माथा नम्रपणे नमविला पाहिजे. या 3. हिंदु बाटत नाही, कोणताहि हिंदु जन्माने इतर हिंदूंहून श्रेष्ठ असू शकत नाहीं अगर कनिष्ठहि असू शकत नाहीं वगैरे कल्पना नुसत्या बोलत राहून भागणार नाहीं; कृतिरूपाने त्या प्रत्यक्ष व्यवहारांत उतरवून दाखविल्या पाहिजेत. त्या तशा उतरवून कशा दाखवाव्या या प्रश्नाचे चिंतन करणे म्हणजेच सामान्यांतल्या सामान्य हिंदूला दैनंदिन व्यवहारांत हिंदुसंघटनावादी बनविणे होय. या दृष्टीने काही सूचना हिंदुसंघटनावादी कार्यकर्त्यांपुढे मांडणे आतां अवश्य झालेले आहे. हिंदुसमाजांत श्रेष्ठकनिष्ठपणाच्या भावना पिढ्यानुपिढ्या चालत आलेल्या आहेत. त्या नाहीशा करण्याचे जाणतेपणाचे प्रयत्न कित्येक वर्षे होत राहातील तेव्हांच हिंदुसमाज पुष्कळसा एकजीव बनेल. हिंदुसमाजांत अद्याप पुष्कळसा धर्मभोळेपणा नांदत असल्यामुळे आणि ज्या समाजाला नव्या कल्पनांची दीक्षा द्यावयाची आहे त्या समाजाच्या मनावरच हया धर्मभोळेपणाच्या धुळीची पुढे बसलेली असल्यामुळे, हया दिशेने 'टाकावयाचे पाऊल निश्चितपणे पण जपून टाकले पाहिजे. संघटनेच्या घाईने विघटनाच घडून आली असा प्रवाद हिंदुसंघटनवाद्यांवर येतां कामा नये. माणुसकी व भूतदया यांच्या आश्रयाने हिंदुसमाजाच्या अंतरंगांत शिरण्याचा प्रयत्न करणे हाच हिंदुसंघटनाचा निश्चित, फलदायी व टिकाऊ मार्ग होय. मनुष्याचा जन्म आणि मनुष्याचा मृत्यु ह्या दोन अवस्था अशा आहेत की त्यांचे महत्त्व व गांभीर्य हे गरीब श्रीमंत, शिक्षित-अशिक्षित अशा सर्वांनाच पटते. सर्वांना सहज पटणाऱ्या प्रसंगांतूनच हिंदुसंघटनावाद्याने आपले कार्य बाढीस. लाविले पाहिजे. मोठमोठ्या शहरांतून जन्माची व मृत्यूची नोंद करण्याची सोय असते. या नोंदीचा उपयोग हिंदुसंघटनावाद्यांनी केला.