पान:पाकिस्तानचे संकट.pdf/229

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१८ . पाकिस्तानचे संकट कल्पना या बरोबर होत्या की चूक होत्या या वितंडवादांत वेळ घालविण्याला हिंदुसंघटनवाद्याने प्रवृत्त होऊ नये. देशकालवर्तमान पाहून या श्रेष्ठकनिष्ठपणाच्या कल्पनेला तिलांजलि दिली पाहिजे एवढी एकच गोष्ट त्याने ओळखिली म्हणजे झाले. जन्मसिद्ध श्रेष्ठपणा, जन्मसिद्ध कनिष्ठपणा, मानीव कनिष्ठपणांतून श्रेष्ठपणाप्रत विकसित होत जाण्याची शक्याशक्यता, या संबंधीचे पांडित्यपूर्ण वाद पंडित अगर पंडितंमन्य खुशाल घालोत; हिंदुसंघटनवाद्यांनी करमणूक म्हणूनहि तिकडे वळण्याचे कारण नाही. हिंदुसंघटनवाद्याने एकच मद्दा मनांत वागविला पाहिजे व कृतींत उतरविला पाहिजे. परदास्यांत पिचत पडलेल्या मानवसमाजांत चातुर्वर्ण्यव्यवस्थेचा लोप परिस्थितीमुळेच झालेला असतो हे सत्य, सभोंवतालच्या परिस्थितीकडे सूक्ष्म नजरेने पाहून,त्याने स्वतः पटवून घेतले पाहिजे व इतरांना पटवून दिले पाहिजे. ____ आज हिंदुसमाजांत चातुर्वर्ण्य आहे कोठे ? वेदोनारायणांनी, शास्त्रीपंडि-तांनी अगर आचार्यमहाचार्यानी खुशाल समजावें की, त्यांच्या ठिकाणी ब्राह्मण्य नांदत आहे. पण; वास्तविक पाहतां ब्राह्मण्य त्यांच्या ठिकाणी नांदत नाहीं! विद्युत व विचारांत त्यांना केव्हांच मागे टाकून पुढे गेलेले जे परदेशस्थ पंडित आहेत, परदेशस्थ तत्त्ववेत्ते आहेत, परदेशस्थ संशोधक आहेत, परदेशस्थ मुत्सद्दी आहेत आणि परदेशस्थ द्रष्टे आहेत ते आजच्या जगांतील खरे ब्राह्मण आहेत. परदास्यामुळे उभा हिंदुसमाज आज निर्बाह्मण, निःक्षत्रिय व ... निर्वैश्य बनला असून, सारा हिंदुसमाज साम्राज्याच्या भारवाहकाचे काम करणारा शूद्र बनला आहे. चातुर्वर्ण्य शिल्लकच नाही तर ते जुनें चातुर्वर्ण्य टिकणार कसे आणि ते जुनें चातुर्वर्ण्य : टिकविण्याची धडपड तरी कशाला? अशा या अवनत काळींहि एक नवें चातुर्वर्ण्य निर्माण होत आहे. निःस्वार्थीपणाने राष्ट्राच्या भवितव्याची चिंता वाहणारे जे जे राष्ट्रधुरीण या देशांत होऊन गेले आहेत व सुदैवाने आजहि हयांत आहेत ते सर्व या नव्या वर्णव्यिवस्थेच्या दृष्टीने ब्राह्मणच आहेत. त्यांचा जन्म कोणत्या जातींतल्या.