पान:पाकिस्तानचे संकट.pdf/228

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हिंदुसंघटनेचा महामंत्र ..२१७ - त्याला आपल्या अंतरंगांतील मानवी शक्तीचा कण नि कण कार्यक्षम बनविला पाहिजे. यालाय ... आजवर आपण ज्या कल्पना उराशी घट्ट बाळगून बसलो आहोत त्याच “ कल्पनांना आपण यापुढेहि बिलगून बसू तर, आपल्यामधील अफाट मानवी शक्ति प्रभावशाली ठरूंच शकणार नाही. ही शक्ति प्रभावशाली करण्याचे पहिले साधन म्हणजे आपल्या डोक्यांत भिनून गेलेल्या कुकल्पना साफ झाडून टाकणे हे होय. . कुकल्पनांची चौफेर माजलेली दलदल पार नाहीशी होईल, आणि स्वच्छ बुद्धि नव्या दृष्टीने परिस्थितीचा विचार करूं लागेल त्या वेळीच हिंदुसंघटनेच्या कार्याची खरीखुरी सुरुवात होईल. ज्या बुरसटलेल्या कल्पना हिंदुसंघटनवादी हिंदूंनी तत्काळ सोडल्या पाहिजेत त्यांतली पहिली कल्पना बाटाबाटीबद्दलची होय. हिंदु वाटू शकत नाही हा त्रिकालाबाधित सिद्धांत प्रत्येकानें - सदैव स्मरणांत ठेविला पाहिजे. मी हिंदु बाटतो असे मानणें अगर म्हणणे हे माणुसघाणेपणाचे नसून हिंदुघाणेपणाचे लक्षण आहे, असे ओळखण्याला आपण स्वतः शिकले पाहिजे व इतरांनाहि तें पटवून देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. स्वेच्छेनें, जाणूनबुजून, समजूनउमजून एकाद्या हिंदूनें हिंदुसमाज सोडला आणि त्याने परसमाजांत प्रवेश केला तरच तो हिंदुत्वाला मुकू शकेल तरच तो बाटेल-हे नवें सूत्र यापूढे लक्षांत बाळगिले पाहिजे. ख्रिस्त्याच्या हातचा पावच काय, त्रिस्त्याचा सबंध हातचा हात पोटांत गेला तरीहि हिंदु पूर्वीइतकाच शुद्ध हिंदु राहातो, हे नव्या युगांतलें आपलें नवें शास्त्र होय. हिंदु कशानेंहि.बाढू शकत नाही ही सत्कल्पना मनावर कायमची कोल्न ठेवणे हे जसें हिंदुसंघटनेच्या कार्याचे एक अंग आहे तसेंच, ___ कोणताहि हिंदू केवळ जन्मामुळे दुसऱ्या हिंदहन श्रेष्ठ असं शकत नाही, या कल्पनेचा चौफेर पुकारा करणे हे हिंदुसंघटनेचे दुसरें . प्रधान अग हाय.TATE आजपर्यंत हिंदु समाजांत रूढ असलेली चातुर्वर्ण्याची कल्पना व त्या कल्पनेच्या बरोबर सावलीप्रमाणे वावरणारी जन्मसिद्ध श्रेष्ठकनिष्ठपणाची