पान:पाकिस्तानचे संकट.pdf/224

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काँग्रेसच्या राजकारणाची इतिश्री २१३ झाला तर, युरोपमधील ख्रिस्ती सत्ताधाऱ्यांना इस्लामी जगाचा धाक वाटेल, असाहि संभव आहे. अशा वेळी संघटित व शक्तिसंपन्न असलेले हिंदुराष्ट्र, न्याय कोणत्या बाजूला आहे हे पाहून, त्या बाजूला वळू शकेल ! आशियांतील बौद्ध राष्ट्रांचें आज ना उद्यां कांहीं योजनेने एकीकरण झाले व त्या बौद्ध राष्ट्रांना इस्लामी जगाचें अगर ख्रिस्ती जगाचे भय वाटू लागले तर, अशा प्रसंगी, हिंदूंचे संघटित सामर्थ्य या बौद्धं जगाच्या उपयोगी पडू शकेल. जगाचें भविष्यकालीन स्वरूप नेमकें अमुकच प्रकारचे बनेल असें आजच सांगणे कठीण असले तरी, इस्लामी जगांत जे विचारांचे वारें अलीकडे खेळत आहे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हिंदुस्थानांत नांदणारा मुसलमानसमाज अशा वाऱ्यांच्या व वावटळींच्या आहारी किती झटकन जातो हे यापूर्वीच्या प्रकरणांतून जें ऐतिहासिक विवेचन केलेले आहे त्यावरून स्पष्ट होण्यासारखे आहे. सरहद्दीनजीकच्या प्रांतांत मुसलमान लोकसंख्या विशेष आहे. तेथें तर या वावटळींची धडक उठल्याबसल्या येऊन पोचत असते. या प्रांतांतील हालचालींकडे डोळ्यांत तेल घालन बघण्याचे धोरण यापुढे हिंदूंना अपरिहार्य म्हणून आंखले पाहिजे आणि येथील मुसलमानांची निष्ठा कोणत्या दिशेने झुकत आहे हे ओळखून, हिंदूंचे स्वतंत्र राजकारण करण्यालाच हिंदूंनी शिकले पाहिजे. असें राजकारण काँग्रेसच्या विचारसरणीच्या कक्षेतच येऊ शकत नाही. या प्रकारचे राजकारण आतां टाळतां येत नाहीं हे ओळखून , काँग्रेसमधील हिंदूंनी काँग्रेसची धोरणेच बदलली तर काँग्रेसलाच हिंदुमहासभेचे स्वरूप येईल; पण, काँग्रेसची सूत्रे ज्या दहावीस लोकांच्या हातांत आहेत त्यांच्या-आणि विशेषतः गांधीजींच्या--वयोमानाचा विचार केला तर काँग्रेसच्या धोरणांत असा इष्ट बदल होण्याची शक्यता नाही, असेंच म्हणावे लागत...... कांहीं एका वयोमानानंतर माणसे आपले मार्ग बदलू शकत नाहीत. गांधीजी ही गोष्ट ओळखीत असावे आणि म्हणूनच त्यांनी असे स्पष्ट शब्दांत म्हटले असावें की, ज्यांच्या मनांत मी हिंदू, हा मुसलमान असे विचार येतात अशा माणसांची अडगळ काँग्रेसमध्ये मला नको आहे ! हिंदूंनी आपले स्वतंत्र राजकारण स्वतंत्रपणेच करावे असाच गांधीजींच्या म्हणण्याचा रोख दिसतो.