पान:पाकिस्तानचे संकट.pdf/223

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१२ पाकिस्तानचे संकट . डाक्यापासून लिस्वनपर्यंत पसरलेल्या कोट्यवधि मुसलमानांना कांहीं नवे विचार सुचू लागले. अफगाणिस्थान, इराण, अरबस्तान वगैरे ठिकाणचे मुसलमान ज्ञानदृष्टया, भौतिकशास्त्रदृष्ट्या व युद्धशास्त्रदृष्टया अद्याप असावे तितके प्रगत नाहीत; पण, या दिशेने प्रगतीचे टप्पे झपाझपा गांठावे आणि ख्रिस्ती जग, पूर्वेकडील बौद्ध जग आणि हिंदुस्थानांतील हिंदुजगं या सर्वांना चाटून जाणारें संघटित इस्लामी जग निर्माण करावे, अशी भावना या देशांतून खेळत आहेत. हिंदुस्थानांतले मुसलमान हे जगांतील एकंदर मुसलमानांच्या मानाने थोडेथोडके नाहीत. एकंदर मुसलमान लोकसंख्येच्या ? लोकसंख्या एकटया हिंदुस्थानांत आहे. आणि त्यामुळेच हिंदुस्थानांतील मुसलमान कांहीं एक नव्या त-हेची भाषा अलीकडे बोलू लागलेले आहेत. या उघड उघड दिसणाऱ्या वस्तुस्थितीकडे डोळेझांक करून, मुसलमानांशी, एकी करण्याच्या भलत्याच कल्पनांवर आधारलेले कोणतेच राजकारण : यापुढे पुरे पडणार नाही. याचा अर्थ असा नव्हे की, मुसलमानांच्या भावनांशी हिंदूंनी सतत झगडतच बसले पाहिजे. मुसलमानांची व हिंदूंची ध्येय व धोरणे क्वचित् प्रसंगी एकरूपहि बनूं शकतील; आणि अशा प्रसंगी ऐक्याची . याचना करीत मुसलमान आपल्या पायाने चालत हिंदूंकडे येतील. अशा वेळी, ऐक्य साधण्याच्या उत्सुकतेचा हिंदूंनी अवश्य उपयोग करून , . घ्यावा; पण, इतर प्रसंगी ऐक्याची हाकाटी करीत हिंदूंनी मुसलमानांच्या मागें मुळींच लागू नये ! त्यांची मनोगते काय आहेत हे ओळखून, त्या, मनोगतांची बाधा हिंदुहिताला व हिंदुस्थानच्या हिताला कोणत्या प्रकाराने होणार नाही इकडेच हिंदूंनी लक्ष दिले पाहिजे. . बऱ्याच बाबतींत जगांतील मुसलमान समाज अद्याप मागासलेला आहे; तोपर्यंतच हिंदुसमाजाने स्वतःचे संघटन व सर्वांगीण शक्तिसंवर्धन केले पाहिजे. अशा प्रकारें संघटित झालेल्या व सर्व दृष्टींनी शक्तिसंपन्न झालेल्या हिंदु समाजाची उद्यांच्या जागतिक कोलाहलांत कोणाला मदत लागेल, हे आजच सांगतां येणार नाही. स्पेनपासून अफगाणिस्थानपर्यंतचा मुसलमान समाज संघटित झाला व प्रगत