पान:पाकिस्तानचे संकट.pdf/222

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काँग्रेसच्या राजकारणाची इतिश्री २११ पाहिजे; अगर आपल्या राजकारणाची इतिश्री झाली हे तरी काँग्रेसनें कबूल केले पाहिजे ! काँग्रेस यांतले काय करील हे सांगणे वा समजणे फार दुर्घट आहे. काँग्रेसची सूत्रे ज्यांच्या हातीं जाऊन बसली आहेत त्या गांधीजींचे हृद्गत प्रगट होतें तेंच मोठ्या विलक्षण पद्धतीनें ! दुष्यंत राजाने शकुंतलेविषयींच्या आपल्या भावना व्यक्त करतांना, न विवृतो मदनो नच संवतः' असे म्हटले आहे. गांधींचा प्रकारहि तसाच होतो. त्यांचे मनोगत पूर्णपणे स्पष्टहि होत नाही आणि ते पूर्णपणे गुप्तहि राहात नाही. अर्धवट व्यक्त झालेल्या गांधींच्या मनोगताची प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार ओढाताण करावी असे आज कित्येक वर्षे चालले आहे. गांधीजींच्या वक्तव्यांतले जे उतारे वर उद्धृत केले आहेत त्यांवरून असे अनुमान निघण्यासारखे आहे की, या ओढाताणीला कंटाळून, अर्धवट अहिंसाभक्तांना काँग्रेसच्या बाहेर जाण्याला गांधीजी आतां फर्मावणार आहेत ! हे लोक अहिंसेच्या अतिमानुष तत्त्वज्ञानांतून मुक्त होऊन, हिंदुसमाजांतली माणसें म्हणून भोवतालच्या जगाकडे पाहूं लागतील, तो सुदिन होय. कारण, हिंदुसमाजांतल्या प्रत्येक जाणत्या माणसाने हिंदु म्हणन भोंवतालच्या जगाकडे पहावे अशीच वेळ आज येऊन ठेपली आहे. हिंदुस्थान सगळ्या जगाचे लक्ष्य व भक्ष्य बनला आहे. शास्त्रीय प्रगति व यांत्रिक संस्कृति यांच्या पूर्णपणें आहारी गेलेल्या ख्स्तिी संस्कृतीला हिंदूंचा हिंदुस्थान म्हणजे एक अफाट कुरण आहे, असे वाटते. या ख्रिस्ती संस्कृतीशी इस्लामी संस्कृतीला उठल्या बसल्या व्यवहार करावा लागतो. इस्लामी संस्कृतीचें एक केन्द्र म्हणजे तुर्कस्थान. हे राष्ट्र युरोपांत असले तरी, तेथील लोक स्वतःला 'आशियाटिक' समजतात. भोवतालच्या युरोपियन राष्ट्रांना भिऊनच वागणे तर्काना पुष्कळ वेळां भाग पडते हे खरे; पण, भिन्न भिन्न ख्रिस्ती राष्ट्रांच्या स्पर्धेमुळे या छोट्या राष्ट्राचा कांहीं लाभही होतो; आणि, या छोट्या राष्ट्राला जगाच्या आधुनिक प्रगतीच्या शर्यतींत मोठेसें मागे राहावें लागत नाहीं! इजिप्त, अल्बेनिया, इराक, वगैरे मुसलमानी राष्ट्रांचीहि थोड्याफार फरकानें हीच स्थिति आहे. गेल्या महायुद्धानंतर ज्या नव्या कल्पना उदय पावल्या आणि तेव्हापासून पॅलेस्टाइन, इराक, इराण वगैरे भागांत ख्रिस्ती सत्तेचा जो वरचष्मा सुरू झाला त्यामुळे