Jump to content

पान:पाकिस्तानचे संकट.pdf/221

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१० पाकिस्तानचे संकट गांधीजींच्या या म्हणण्यांत अहिंसाप्रेम असेल; पण त्यांना जी शूरांची अहिंसा अभिप्रेत आहे तिचा मात्र यांत कुठेच मागमूस लागत नाहीं ! आणि तो मागमूस अशा उद्गारांत लागावा तरी कसा? शूरांची अहिंसा समाजांत झळकू लांगावयाची असेल तर समाज प्रथम शूर बनला पाहिजे. शौर्यच नसेल तर शूरांची अहिंसाहि संभवत नाही. शंभर वेळां शौर्य गाजविणारा मनुष्य, तसा प्रसंग येईल तेव्हां, शूरांची अहिंसा आचरून दाखवील; पण,ज्याने शौर्याचा एकहि प्रसंग पाहिला नाही अशा माणसाकडून अगर अशा समाजाकडून शूरांच्या अहिंसेचे आचरण व्हावे कसे? औरंगजेबाच्या अमानुष छळाची कल्पना दृष्टीपुढे मूर्तिमंत नाचत असतां, त्याला बेदरकारपणे उत्तर देऊन, मरणाला मिठी मारणारे हुतात्मा श्री संभाजी महाराज शूराची अहिंसा कशी असते हे स्वतःच्या उदाहरणाने दाखवू शकतात ! स्वतःच्या लेकरांचा चाललेला अमानुष छळ निमूटपणे साहुन, अभयवृत्तीने मरण पतकरणाऱ्या शीख गुरुश्रेष्ठांनी शूरांच्या अहिंसेची भाषा काढली तर ती शोभून दिसते ! पुढच्या जन्मींची फाशीची शिक्षाहि आतांच देत असाल तर द्या असें म्हणून, हातांत भगवद्गीता घेऊन, हंसतमुखाने फांसावर लटकण्याला प्रवृत्त होणाऱ्या दामोदरपंत चाफेकरांच्या तोंडी शूराची भाषा शोभेल! कानपूरच्या दंग्यांत, मृत्यु समोर दिसत असतां, बिलकूल न डगमगतां मरण पत्करणाऱ्या गणेश शंकर विद्यार्थीजींनी शूरांच्या अहिंसेची महति सांगितली तर ती सार्थ ठरेल! पण, जो समाज शेंसव्वाशे वर्षे परकी अंमलामुळे पिचून निघाला आहे, ज्या समाजाला साधे जीवन जगण्यासाठी हरघडी मानहानीचे प्रसंग गिळावे लागत आहेत आणि ज्या समाजाला सर्वांगीण प्रतिकाराची शिकवण , नीटशी देण्यांतच आलेली नाही त्या समाजाकडून शूरांच्या अहिंसेचे पालन व्हावें कसे? अशा समाजाला शूरांच्या अहिंसेचे पालन करावयाला सांगणें ... म्हणजे, अहिंसेवर विश्वास न ठेवणाऱ्या लोकांच्या भक्ष्यस्थानी .. त्या समाजाची योजना करणेच होय. 'तात्पर्य असे की, अहिंसावाद आणि हिंदु-मुसलमान यांच्या विषयींचें धोरण या दोन्ही बाबतीत काँग्रेसचे धोरण गेली २०-२१ वर्षे पार चुकत आलेले असल्यामुळे, एक तर या दोन्ही बाबतींतलें धोरण काँग्रेसने बदललें