पान:पाकिस्तानचे संकट.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

खोटी कल्पना व तिचे खंडण स्वरूपाचा शब्दप्रयोग आहे. एखाद्या वर्गाला अल्पसंख्य म्हणून गोंजारतांना साम्राज्यवादी मुत्सद्दी कोणती कसोटी लावतात याचे वर्णन K.B. Krishna. या लेखकाने पुढीलप्रमाणे केले आहे : A minority in order to be called such must satisfy certain requirements of Imperialism. It must not be seditious. It must not be a disloyal element. It must be moderate, nay, even reactionary. It must be amenable to flattery. * (एखाद्या वर्गाला अल्पसंख्य ही पदवी बहाल करण्यापूर्वी साम्राज्यवादी मुत्सद्दी त्याला कांहीं कसोटी लावीत असतात व जो वर्ग त्यांना उतरेल त्यालाच अल्पसंख्यत्वाचे मानमरातब दिले जातात. यांतली पहिली कसोटी अशी की, तो वर्ग राजद्रोही असतां कामा नये--त्याची राजनिष्ठा संशयातीत असली पाहिजे. त्या वर्गाची वृत्ति नुसती नेमस्तच नव्हे तर प्रतिगामीहि असणे अवश्य आहे; शिवाय, तो वर्ग स्तुतिपाठांना भाळणाराहि असला पाहिजे.) या सर्व कसोटींना तंतोतंत उतरणाऱ्या भारतीय मुसलमान समाजाला स्तुतीने चढवून ठेविला म्हणजे त्या समाजाचा साम्राज्याच्या स्वार्थ-संवर्धनाला नामी उपयोग होईल हे हेरून, ब्रिटिश मुत्सद्दी व लेखक असा आभास निर्माण करीत आले आहेत की, दिल्लीच्या सार्वभौम तख्तावर भारतीय राजसत्तेचे उपभोक्ते म्हणून इंग्रज आरूढ झाले ते मोगलांच्या साम्राज्यसत्तेचे वारसदार म्हणून झाले ! 'खुलक खुदाका, मुल्क पादशाहका, अंमल अंग्रेज सरकारका' हा भोंगळ वाक्प्रचार मोगलांची साम्राज्यसत्ता संपुष्टांत आल्यानंतर कैक वर्षेपर्यंत लोकांच्या तोंडी परंपरेनें टिकून राहिला होता. त्याचाहि उपयोग ही अनैतिहासिक समजूत दृढ होण्याकडे झाला. अन्नाला मोताद झालेला कोणी तरी मुसलमान विधिमंडळांतल्या वा वृत्तपत्रांतल्या चर्चेत एकदम अनाहूतपणे प्रसिद्ध व्हावा, हा मोगल बादशाहांचा वारस असून इंग्रज सरकार त्याला पन्शन--अर्थात् तैनात–कां देत नाही असे जाबसाल व्हावे व अशा रीतीनें, इंग्रजांच्या पूर्वी साम्राज्यसत्ता मोगलांची म्हणजे मुसलमानांची होती या

  • The Problem of Minorities or Communal Representation in India, p. 21.