पान:पाकिस्तानचे संकट.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण २रें खोटी कल्पना व तिचे खंडण भारतांतल्या सर्व भूभागावर ज्याचें अधिराज्य चालेल अशा एकमुखी व एकसंध केंद्रीय शासनयंत्राला विरोधणे हाच पाकिस्तान कल्पनेंतला बीजमंत्र आहे, (The essence of Pakistan is the opposition to the establishment of one Central Government having supremacy over the whole of India.)* हे डॉ. आंबेडकर यांचे म्हणणे बरोबर आहे. अशा शासनयंत्राला विरोधण्याला मुसलमान का प्रवृत्त होतात या प्रश्नाचे एक उत्तर गेल्या प्रकरणांत दिले. भारतांत निर्माण होणारी व नांदणारी मध्यवर्ति लोकशाही राज्यपद्धति कशाहि स्वरूपाची असली तरी त्या लोकशाहीवर गांधीकाँग्रेसच्या सर्वभूतहितेरतत्वाचा छाप बसला असला तरी त्या पद्धतीत मुसलमानी वर्चस्व असू शकणार नाही हे मुसलमानांना स्पष्ट दिसत आहे. मुसलमानेतरांच्या--विशेषतः हिंदूंच्या--वर्चस्वाखाली नांदणें अधर्म्य आहे अशी त्यांची समजूत असल्यामुळे-अगर तशी समजूत करून देण्यात आली असल्यामुळे हिंदु वर्चस्वाखालीं नांदणाऱ्या भरतखंडाचा एक सुभा करा के इस्लामी वर्चस्वाखालीं नांदणारा एक सुभा 'पाकिस्तान' या नांवाने आम्हाला तोडून द्या असें मुसलमान म्हणत आहेत. त्यांच्या मागणीभोंवतीं में धार्मिक अवगुंठन आहे ते अशा प्रकारचे आहे. ते मान्य करणें कां शक्य नाही याचा विचार पुढील कित्येक प्रकरणांतून सविस्तर करावाच लागेल.. - पाकिस्तानच्या मागणीचा उगम आणखीहि एका खोट्या कल्पनेतून झालेला आहे. ब्रिटिश साम्राज्याच्या धोरणी सूत्रचालकांनी भरतखंडांतील आपली सत्ता स्थिर राहावी म्हणून ज्या अनेक मसलती केल्या व जे अनेक भाषाप्रयोग रुळविले त्यांत 'अल्पसंख्य व त्यांचे संगोपन' हा एक सोज्ज्वल

  • Thoughts on Pakistan, p. 5.