पान:पाकिस्तानचे संकट.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाकिस्तानचे संकट गैरसमजावर पुनरुक्तीची पुढे चढावी असे प्रकार अनेकवार घडले आहेत. त्यामुळे मुसलमानांनी आपली अशी सोइस्कर समजूत करून घेतली आहे की, मुसलमानांना तख्तावरून ओढून राजसत्ता आपल्या हाती घेणाऱ्या इंग्रजांना न्यायाची कांहीं चाड असेल तर, हातची सत्ता सोडतांना, त्यांनी मुसलमानांना फिरून तख्तावर बसविले पाहिजे--निदान मुसलमानांना हिंदुसत्तेच्या वालीं तरी करतांच कामा नये ! अखंड भारताच्या एकछत्री राज्यकारभाराची आधुनिक पद्धतीची कसलीहि योजना विचारासाठी पुढे आली तर मुसलमानांना आपलें मुसलमानपण सार्वजनिक व्यवहारापूरतें तरी विसरून, हिंदु, ख्रिस्ती, पार्शी, ज्यू इत्यादिकांशी 'हिंदी' म्हणून एकरूप तरी झाले पाहिजे अथवा हिंदूंचे संख्याधिक्य निमूटपणे मान्य करून संख्याबलाच्या प्रमाणांत मिळेल तेवढा सत्तेचा अंश यथान्याय-यथाप्रमाण स्वीकारून समाधान तरी मानले पाहिजे, हे उघड आहे. पण, 'वादशाहाचे बेटे' म्हणून इंग्रजांनी चढवून ठेवलेले व स्तुतिप्रियतेमुळे स्वतः चढून गेलेले मुसलमान यांतले कांहींच पतकरण्याला आज राजी दिसत नाहीत. आणि म्हणूनच, पाकिस्तान हा भरतखंडाचा एक तुकडा तोडून घेऊन तेथे आपली स्वतंत्र सत्ता ‘मनःपूतं समाचरेत् ' या न्यायाने उपभोगण्याचे डोहाळे त्यांना सुचत आहेत. ____ इंग्रजांना भारतीय साम्राज्याच्या शास्त्यांची पदवी व प्रतिष्ठा लाभली ती मोगल सम्राटांच्या वारसदारीमुळे नव्हे हे ऐतिहासिक सत्य इतकें स्पष्ट आहे की, वस्तुतः तें सिद्ध करीत बसण्याचेंहि कारण नाही. पण, इंग्रजांच्या प्रेरणेमुळे भारतीय इतिहासलेखनाला अनिष्ट वळण लागल्यामुळे, या सत्याला खग्रास ग्रहण लागले आहे. शालेय इतिहासापासून इतिहासलेखनाला जो प्रारंभ होतो तोच एका ठरीव त-हेचा असतो. त्यामुळे मुसलमानी वर्चस्वाचा काळ व इंग्रजी वर्चस्वाचा काळ यांच्या माना जिराफाच्या मानेप्रमाणे प्रमाणाबाहेर लांब झालेल्या दिसतात आणि इंग्रजांचा उत्कर्ष सुरू होण्यापूर्वी मुसलमानांची साम्राज्यसत्ता पोखरण्याचे वा उलथून पाडण्याचे जे प्रयत्न हिंदूंनी अव्याहतपणे केले त्यांची, दोन एडक्यांच्या टकरीत सांपडलेल्या तांब्याच्या पैशाप्रमाणे दामटी वळून जाते ! वास्तविक पाहातां, भारताचा सगळा इतिहास हा हिंदूंचाच इतिहास आहे. या हिंदु इतिहासाच्या शरीरांतलें रक्त कधीं