पान:पाकिस्तानचे संकट.pdf/217

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०६ पाकिस्तानचे संकट आले. आपण हिंदुसमाजाच्या वतीने जीनांना भेटण्यासाठी कां जाऊं शकत नाहीं हे सबूंना सांगतांना गांधीजींनी पुढील अर्थपूर्ण वाक्य लिहिले आहे : ": I do not represent the Hindu community. I am not even a member of the Hindu Mahasabha. (मी हिंदु समाजा प्रतिनिधित्व करू शकत नाही. मी हिंदुमहासभेचा साधा सभासदहि नाही.) ___ गांधीजींच्या या लिहिण्यावरून पुष्कळ प्रश्न सुचण्यासारखे आहेत. प्रायः हिंदु समाजातर्फे निवडून गेलेले व स्वतःच्या वर्तनाने फक्त हिंदूंचेच प्रतिनिधि ठरलेले काँग्रेस मंत्रिमंडळांतील हिंदु-मंत्रि हिंदु समाजाचे प्रतिनिधित्व करूं शकत नाहीत, अशी कबुलीच गांधीनी या वाक्यांत दिलेली आहे. कारण, हे मंत्रि हिंदू महासभेचे सभासद नव्हते; इतकेच नव्हे तर, मंत्र्यांपैकी एकाद्याला हिंदुमहासभेचे सभासदत्व स्वीकारावे असे वाटले असते तरी, तसे करणे त्याला शक्य नव्हतें! काँग्रेसच्या नियमांनीच त्याचा हा मार्ग बंद झालेला होता. हिंदुसमाजाचे प्रतिनिधित्व करणारा मनुष्य हिंदुसभेचा सभासद तरी असला पाहिजे, ही गांधीजींची अपेक्षा मात्र त्यांच्या अकरणरूप विधानांतूनहि चोरूनमारून बाहेर डोकावत आहे ! हिंदुसमाजाला आपल्या हितरक्षणासाठी आपले प्रतिनिधी निवडून द्यावयाचे असतील तर, त्याने हिंदुमहासभेच्या सभासदांनाच निवडून द्यावें ही गांधीजींकडून अप्रत्यक्षपणे मिळालेली कबुली हिंदु मतदारांना यापुढे मार्गदर्शक ठरणारी आहे! असेंब्लींतील अल्पसंख्याक प्रतिनिधींनी निवडून दिलेले मंत्रि मंत्रिमंडळांत समाविष्ट केले तर, मंत्रिमंडळाच्या कामांत संयुक्त जबाबदारीचे तत्त्व शिल्लकच राहाणार नाही असा आक्षेप वरील विवेचनावर घेतला जाण्याचा संभव आहे. अन्नमलाई विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ० सी० आर० रेड्डी यांनी लिहिलेल्या " Congress in Office" या पुस्तकांत या आक्षेपाचे उत्तर देण्यात आलेले आहे. जोपर्यंत जातवारीचे स्वतंत्र मतदारसंघ आहेत तोपर्यंत प्रातिनिधिक मंत्रिमंडळ व संयुक्त जबाबदारीचे तत्त्व यांचा पूर्णांशाने मेळ घालणे निसर्गतःच कठिण आहे.