पान:पाकिस्तानचे संकट.pdf/218

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काँग्रेसच्या राजकारणाची इतिश्री .२०७ कारण, सामुदायिक जबाबदारीचे तत्त्व पाळण्यासाठी केवळ एकपक्षीय मंत्रिमंडळ बनविलें तर त्यांत स्वतंत्र मतदारसंघांतर्फे निवडून आलेल्या प्रतिनिधींचा अंतर्भाव होईल असें नाहीं आणि तेवढ्या अर्थाने तें मंत्रिमंडळ 'प्रातिनिधिक ठरू शकणार नाही. 'ज्या देशांत सर्व मतदारसंघ शुद्ध नागरिकत्वाच्या पायावर ___ निर्माण केलेले आहेत आणि जेथें स्वतंत्र मतदारसंघ अजिबात ... · अस्तित्वात नाहीत तेथे एकपक्षीय व प्रातिनिधिक अशा दोन्ही .... .... प्रकारचे मंत्रिमंडळ नांदूं शकतें. जातीय निर्णयाने स्वतंत्र मतदारसंघ चालू ठेविले; एवढेच नव्हे तर, नवे स्वतंत्र मतदारसंघहि या निर्णयाने अस्तित्वांत आणिले. संयुक्त जबाबदारीच्या तत्त्वाला इतका मध चिकटला आहे असेंच जर काँग्रेसला वाटत होते तर तिने १९३६च्या निवडणुकीत उडी घेण्याचेच कारण नव्हतें! . अशा सर्व दृष्टींनी विचार केल्यास काँग्रेसची स्थिति 'इदंच नास्ति, परं न लभ्यते' अशी झाली. मंत्रिमंडळांनी आपल्या कृतीने स्वत ला हिंदु ठरवून घेतलें; आणि,हिंदूंच्या हिताचा प्रश्न आला म्हणजे मात्र त्यांनी विश्वामित्र मेनकेच्या चित्रांतल्या विश्वामित्राचा आव आणण्याला आरंभ 1. केला! ' आणि, काँग्रेसच्या वागण्यांत हा जो गोंधळ सुरू झाला तो अद्यापहि थांबलेला नाही.. मध्यंतरी बिहार प्रांतांत दंगे झाले त्या वेळी डॉ० राजेन्द्रप्रसाद व ब० सावरकर यांच्या दरम्यान बरीच वादावादी झाली. या वादांत राजेन्द्रबाबूंनी मोकळ्या मनानें असें कबूल केले की, काँग्रेस फक्त हिंदूंनाच उपदेश करते याचे कारण काँग्रेसला फक्त हिंदूच मानतात, मुसलमान तिला मुळीच मानीत नाहीत! काँग्रेसला मानल्याबद्दल हिंदूंना बक्षिस कोणतें मिळतें तर हिंदु म्हणून हिंदूंचे हितरक्षण करावयाचे असेल तर त्या प्रश्नाशी काँग्रेसचा काडीचाहि संबंध नाही, असें बेमुर्वतखोरपणाचें उत्तर बेपर्वाईने देण्यांत अत! एवढ्यावरून देखील एक गोष्ट सिद्ध होईल. ती अशी की, ...