पान:पाकिस्तानचे संकट.pdf/215

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०४ पाकिस्तानचे संकट । पुढे काँग्रेसनें मंत्रिमंडळांत मुसलमान मंत्रि घेण्याचे ठरविले. हे ज्या दिवशी ठरले त्याच दिवशी काँग्रेसने कृतीने असें कबूल केले की, काँग्रेस कितीहि मोठी असली तरी, ती मुसलमानांची ' प्रतिनिधि नाही आणि मुसलमानांचे हितसंरक्षण करण्याचे स्वयंभू सामर्थ्यहि तिच्यांत नाही! मुसलमान मंत्रि पैदा करण्याचें व पुरविण्याचे काम मौ०अबुल कलाम अझाद यांच्याकडे देण्यात आले. मंत्र्यांचे संशोधन करण्याची ही रीतच फार सदोष आहे. मुसलमान मंत्रि घ्यावयाचा तो कांहीं मुसलमान म्हणूनच घ्यावयाचा नव्हता! मंत्रिमंडळांत महत्त्वाच्या अल्पसंख्याक वर्गांचे प्रतिनिधि समाविष्ट व्हावे. असें गव्हर्नरांना मिळालेल्या आदेशपत्रांत ( Instrument of Instructions ) स्पष्टपणे सांगितलेले असल्यामुळेच, मुंबई, मद्रास प्रभृति प्रांतांतून अहिंदु मंत्र्यांना मंत्रिमंडळांत स्थान देणे अवश्य होते. असें जर आहे तर, मौलाना अझाद यांच्या मर्जीतल्या मुसलमानांची वणी मंत्रिमंडळांत कां लावण्यात आली ? प्रांतिक असेंब्लीमध्ये जे अल्पसंख्याकांचे प्रतिनिधी होते त्यांच्यावर अशी जबाबदारी टाकतां येण्यासारखी होती की, त्या सर्वांनी एकत्र 2. बसून, सर्वांचे प्रतिनिधा म्हणून, दोन, तीन काय हवे ते मंत्री निवडून द्यावे ! * असे झाले असते तर, सर्व अल्पसंख्याकांना परस्परसहकार्याने वागण्याचे शिक्षण तरी काँग्रेसला देतां आले असते. शिवाय, हे मंत्रि आमचे प्रतिनिधी नव्हत असें फणकाऱ्याने म्हणण्याची अल्पसंख्याकांना सोयच उरली नसती! मौलाना अझादनी आपल्या मर्जीतले मुसलमान मंत्री मंत्रि-मंडळांत घुसविले आणि त्यामुळे They chose men from the gutter to represent our community (आमच्या समाजाचे प्रतिनिधी म्हणून या शिष्टांनी दीडदमडीची माणसें निवडून काढलीं !) हे उद्गार काढण्याची संधि जीनांना लाभली ! ६. काँग्रेसनें असें केलें असतें तर, काँग्रेस ही केवळ हिंदूंची संस्था ठरली असती असा आक्षेप वरील विचारसरणीवर घेतां येण्यासारखा आहे. पण, त्या