पान:पाकिस्तानचे संकट.pdf/214

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काँग्रेसच्या राजकारणाची इतिश्री २०३ परस्पर संबध आजच्या इतके बहुधा चिघळलेहि नसते आणि राजपुत्राच्या आगमनप्रसंगी देशभर पडलेल्या बहिष्कारासारख्या गोष्टींचा पुरा फायदा घेऊन, सत्ताविकासहि अधिक लवकर आणि अधिक निश्चितपणे साधतां आला असता. पण, त्या वेळी काँग्रेसवर असलेली ही गर्भित जबाबदारी अंगाबाहेर टाकण्यांत आली; आणि, ज्या वेळी ही जबाबदारी काँग्रेसनें उचलू नये अशी परिस्थिति सरकारने निर्माण केली त्यावेळी काँग्रेस ने सदर जबाबदारी नेमकी स्वशिरावर घेतली ! १९३७ सालच्या निवडणुकीनंतर काँग्रेसचे सात प्रांतांत निर्विवाद बहुमतः झाले. १९३७च्या जुलैमहिन्यांत काँग्रेसनें मंत्रिमंडळे बनविली. या मंत्रिमंडळांत मुसलमान मंत्र्यांचा समावेश करण्याचे धोरण काँग्रेसने स्वीकारले. तें अनेक दृष्टींनी सदोष आहे. काँग्रेस ही सर्व जाती, सर्व धर्म इत्यादींचे हितसंगोपन करूं शकते ही काँग्रेसची बढाई या धोरणामुळे सार्थ ठरली नाही. कारण, टोपी बदलून काँग्रेसमध्ये घुसलेल्या मुसलमानांच्या डोक्यावर तिनें मंत्रिपणाचे मुकुट चढविले ! मुसलमान मंत्रि मंत्रिमंडळांत घेण्याचा आग्रह प्रांतोप्रांतीच्या गव्हर्नरांनी धरलाच असता तर, त्या गोष्टीचा मागाहून विचार करता आला असता. गव्हर्नरांनी बहुधा असा आग्रह धरला नसता. एका प्रांताच्या पंतप्रधानाचे त्या प्रांताच्या गव्हर्नराशी मंत्रिमंडळ बनविण्याचे वेळी या बाबतीत काय बोलणे झालें तें प्रसिद्ध होणे शक्य नव्हते; पण, तें आतां सांगण्याला काहीच हरकत नाही. 'मंत्रिमंडळांत मुसलमान घेण्याबाबत तुमचे काय ठरले आहे' असा प्रश्न गव्हर्नरने या पंतप्रधानाला विचारला. तेव्हां त्याने ठसकेबाजपणानें असें उत्तर दिले म्हणतात की, शतकानुशतकें मुसलमानांच्या शेजारी आम्ही राहात असल्या, मळे, मुसलमानांचे हितरक्षण कसे करावें हे आम्ही चांगले जाणतों. सहा हजार कोसांवरून येथे येऊन तुम्ही त्या बाबतींत आम्हांला कांहीं सांगण्याचे कारण नाही. या उत्तरानंतर गव्हर्नरनें कांहीं कुरकुर केली नाही, ही गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहे.