पान:पाकिस्तानचे संकट.pdf/210

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काँग्रेसच्या राजकारणाची इतिश्री सत्ता सुटणार आहे इंग्रजांच्या हातून व ती कोणाच्या हाती पडणार, असा आहे प्रश्न ! ब्रह्मज्ञानाने अंतर्बाह्य विनटलेल्या ज्ञानिश्रेष्ठांप्रमाणे , अहिंसाव्रतावरील श्रद्धेनें अंतर्बाह्य विनटलेल्या लोकांनी काँग्रेस गजबजून जाईल, श्रीज्ञानेश्वर महाराजांनी म्हटल्याप्रमाणे या लोकांच्या अहिंसाविषयक श्रद्धेचा परिमळ, केळींत तयार होऊन राहिलेल्या कापुराच्या परिमळाप्रमाणे, आपोआप चौफेर पसरूं लागेल, अगर या लोकांच्या अहिंसेवरील प्रेमाचें तेज तावदानांत ठेवलेल्या दिव्याच्या प्रकाशाप्रमाणे आपोआप बाहेर ओसंडूं लागेल तर आणि तेव्हांच इंग्रजांच्या हातून सुटणारी सत्ता काँग्रेसच्या हाती पडू शकेल व काँग्रेसला त्या सत्तेचा वापर जवाबदारीने करता येईल, असा गांधीजींच्या म्हणण्याचा अर्थ आहे. । ___ सध्यांच्या काँग्रेसच्या बाबतींत गांधीजींना ही शक्यता दिसत नाहीं हेहि गांधीजींच्याच उद्गारांवरून स्पष्ट दिसत आहे. गांधीजी म्हणतात : I do not mind Congressmen changing their creed, in spite of many leaders being in jail or openly leaving the Congress. I can see my way to rebuilding the Congress with fine true men with whom there is neither Hindu nor Muslim nor any other. - (पुष्कळ काँग्रेस पुढारी तुरुंगांत असले तरीहि काँग्रेसजनांनी खुशाल आपलें, क्रीड (श्रद्धा) बदलावें अगर उघडपणे काँग्रेसमधून निघून जावें! ज्यांच्या मनांत हिंदु, मुसलमान वगैरे विचार येत नाहीत अशा उमद्या, खणखणीतः माणसांचा मेळावा मिळवून मला काँग्रेसची घडी फिरून बसवितां येईल, हे मला स्पष्टपणे दिसत आहे.) सध्या काँग्रेसमध्ये असलेली पुष्कळशी प्रमुख माणसें अहिंसापालनाच्या बाबतींत खणखणीत नाहीत असें गांधीजींचें स्पष्ट मत आहे व या लोकांनी काँग्रेसमधून निघून जावें अशी नोटीसच गांधीजींनी त्यांना दिली आहे! या लोकांची अडगळ काँग्रेसच्या बाहेर गेली म्हणजे आपल्या पसंतीचे शेलके 'अहिंसा-ऋषि' मिळवून, काँग्रेसची पुनर्घटना करण्याचा प्रयोग गांधीजी करणार आहेत, हेहि वरील उताऱ्यावरून उघड दिसत आहे. मुंबईचे श्री०कन्हय्यालालजी मुनशी हे काँग्रेसमधून बाहेर पडले व गांधीजींनी ७