पान:पाकिस्तानचे संकट.pdf/211

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०० पाकिस्तानचे संकट त्यांना आशीर्वादपूर्वक बाहेर जाऊ दिलें या घटनेमागें मनाचे किती 'गुप्त पडदे असतील, याची कल्पना आतां सहज होऊ शकेल! सध्या काँग्रेसमध्ये असलेले पुष्कळसे थोर हिंदु गांधींना हवे असलेले 'अहिंसा-ऋषि' नाहीत हे उघड आहे. ते मुनशींचे अनुकरण करतात, गांधीतत्त्वज्ञानाचे उच्चाटन करून काँग्रेस आपल्या हातीं घेतात की, फिरून गांधींना शरण जाऊन आत्मप्रतारणा व हिंदुराष्ट्रप्रतारणा करतात, हे लौकरच दिसेल ! - ज्या नमुनेदार अहिंसानिष्ठ संघटनेच्या हाती इंग्रजांनी सोडलेली सत्ता पडावी असें गांधीजींना वाटते तशी संघटना म्हणजे सध्यांची काँग्रेस नव्हे, हे गांधीजींच्याच शब्दांतून सूचित होत आहे. नवे 'अहिंसा-ऋषि ' मिळवून गांधीजी काँग्रेसला नमुनेदार रूप आणतील त्याला अद्याप अवधि आहे ! त्या अवधींत सत्तासंक्रमण होण्याचा समय प्राप्त झाला तर 'ती सत्ता कोणाच्या हातीं जाईल याबद्दलचा गांधीजींचा खुलासा, मोठा सूचक आहे : The power will descend to those who are able to make effective use of viol nce. (ज्यांना हिंसाधर्माचा उपयोग प्रभावीपणाने करतां येईल त्यांच्या हातीं ही सत्ता पडेल) असा इषाराच गांधीजींनी दिला आहे, असे म्हणावयाला हरकत नाहीं! हिंसाधर्माचा उपयोग प्रभावीपणाने करून, इंग्रजांच्या हातून सुटणारी सत्ता काबीज करण्याची संधि कोण साधील हे गांधीजींनी या लेखांत सांगितलेले नाही, हे खरे; पण, या प्रश्नाचे उत्तर गांधीजींनी कधीच दिलेले नाही, असा मात्र त्याचा अर्थ नव्हे. १९४०च्या ऑक्टोबर महिन्यांत 'हैदराबाद' । या शीर्षकाखाली लिहिलेला गांधीजींचा एक लेख 'हरिजन' मध्ये प्रसिद्ध झालेला होता. त्या लेखाचे सार असें होतें कीं,चालू लढाईत बिकट परिस्थिति उत्पन्न झाली व प्रचलित राजसत्ता दुबळी बनल्याची लक्षणे दिसू लागली तर, निजामचे लष्करी सामर्थ्य व सरहद्दीवरच्या पठाणांच्या टोळ्या यांचे संगनमत होऊन भारतांतली राजसत्ता निजामाच्या हातीं जाईल! निजामाची राजसत्ता ही देशी राजसत्ता असल्यामुळे, त्या सत्तेला 'होमरूल' असें नांव देण्याची गांधीजींची तयारी आहे, हा भाग निराळा!