पान:पाकिस्तानचे संकट.pdf/209

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९८ __पाकिस्तानचे संकट . गांधीप्रणीत अर्थ मान्य केला पाहिजे, काँग्रेसला मते देणाऱ्या लक्षावधि मत. दारांनी गांधीप्रणीत अहिंसावाद स्वीकारून त्याचे आचरण दंग्याधोप्याच्या प्रसंगी केले पाहिजे वगैरे अपेक्षा मनुष्यस्वभावाला धरूनच नसल्यामुळे, त्या फसल्या यांत कांहींच आश्चर्य नाहीं! काँग्रेसचे सत्याग्रही म्हणून गांधीजींच्या मान्यतेचा शिक्का मिळालेल्या लोकांनी तुरुंगांत मांसाहार करावा हेंहि मनुष्यस्वभावाला धरून आहे; पण, तें गांधीजींच्या अहिंसा. मीमांसेशी विसंगत आहे ! अहिंसेचा कांहीं तरी एकांतिक अर्थ लावून त्याचा उपदेश सामूहिक पद्धतीने केल्यानंतर, पदरी पश्चात्ताप पडला तर त्यांत नवल मुळीच नाही! कै० कविश्रेष्ठ टागोर यांनी लिहिलेले वाक्यच या प्रकरणी खरें मार्गदर्शन करूं शकतें! In the harmony of two contradictory forces, everything rests (परस्परविरोधी अशा दोन शक्तींच्या समन्वयावरच प्रत्येक गोष्ट उभारलेली आहे), हा नियमच हिंसा-अहिंसेच्या तत्त्वज्ञानाला लागू पडतो व समाजांची व राष्ट्रांची ऐहिक प्रगति तरी या दोन शक्तींच्या समन्वयावरच अवलंबून आहे ! काँग्रेस ही संस्था अहिंसावतावर श्रद्धा ठेवूनच चालली पाहिजे असा गांधीजींचा आग्रह आहे, हेंहि त्यांनी अलीकडे प्रसिद्ध केलेल्या कांहीं वक्तव्यांच्या आधारे सिद्ध करता येईल. वर ज्या पत्रकाचा उल्लेख केला त्यानंतर लौकरच गांधीजींचा एक लेख प्रसिद्ध झालेला आहे. त्यांत ते लिहितात : I prophesy that, without pervasive non-violence of the brave, when the question of real transfer of power comes, it would not be the Congress which will have the privilege and the responsibility of delivering the goods. The power will descend to those who are able to make effective use of violence. (शूरांना साध्य होणारी अंतर्बाहय अहिंसानिष्ठा काँग्रेसमध्ये नसेल तर, खरी सत्ता मिळण्याची वेळ येईल तेव्हां, सत्तारूढ होण्याचा मान व त्या मानाबरोबर येणारी जबाबदारी या गोष्टी काँग्रेसला साध्य होणार नाहीत, असें भविष्य मी वर्तवन ठेवितो. ज्यांना हिंसेचा उपयोग प्रभावशालीपणाने करता येईल, त्यांच्या हाती ती सत्ता पडेल.)